अमिताभ बच्चन.. सर्वात मोठा सुपरस्टार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना तर अनेकजण या शतकातील सर्वात मोठा सुपरस्टार असे देखील म्हणतात. त्यांच्यासारख्या महान नायक बॉलिवूडमध्ये आहे हे आपणा भारतीयांचे समजायला हवे. आजवर बॉलिवूडमध्ये अनेक स्टार आले आणि गेले, पण बच्चन यांची बातच न्यारी. आजवर क्वचितच कोणी असा स्टार असेल ज्याने आपल्या तरुण पणापासून अगदी वयाच्या सत्तरी ओलांडल्यानंतरही चाहत्यांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण त्यांचा चाहता आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून चाहत्यांच्या मनावर केलेलं गारूड गेल्या चार ते पाच दशकांपासून आजही कायम आहे. बॉलिवूडमध्ये प्रत्येक जण त्यांच्याकडे सन्मानाने पाहतो. अनेक जण तर त्यांच्याकडे पाहून अभिनयक्षेत्रात आले आहेत.

11 ऑक्टोंबर रोजी त्यांनी 77 व्या वर्षात पदार्पण केले. मात्र वयाची ऐंशी गाठणाऱ्या या चिरतरुण अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना कधीही आपल्या वयाची जाणीव होवू दिली नाही. वयाच्या सत्त्यात्तराव्या वर्षी सुद्धा चित्रपटाच्या अनेक ऑफर त्यांच्याकडे आहेत. कोणतेही पात्र साकारताना त्यात जीव ओतण्याची तळमळ त्यांच्या प्रत्येक अभिनयातून दिसत असते. आज आम्ही तुम्हाला त्यांनी निभावलेल्या आणि आजवर लक्षात ठेवल्या गेलेल्या सात पात्रांबद्दल सांगणार आहोत.

अग्निपथ

http://www.elitecolumn.com

1990 साली रिलीज झालेल्या अग्निपथ या सिनेमाने प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली होती. या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी विजय नावाचं पात्र साकारलं होतं. बच्चन यांनी ज्या स्टाईलमध्ये आणि ज्या अंदाजात त्या पात्रांमध्ये जीव ओतला कदाचित ते दुसऱ्या कुठल्याही कलाकाराला जमणारं नाहीये. त्यामुळेच चाहते त्यांचा अभिनय इतक्या मोठ्या प्रमाणात पसंत करतात. या सिनेमातला त्यांचा डायलॉग आजही तितकाच फेमस आहे, अनेकजण या डायलॉगची कॉपी करून त्यांच्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतात पण बच्चन शेवटी बच्चनच.

निशब्द

https://www.cinestaan.com

हा चित्रपट 2007 यावर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील अमिताभ यांची भूमिका थोडीशी चॅलेंजिंग अशी होती. निशब्द चित्रपटात अमिताभ यांनी पात्र साकारलं होतं ते खरंच कमालीचं होतं. या सिनेमात त्यांना त्यांच्या पेक्षा निम्म्या वयाच्या म्हणजेच थोडक्यात त्यांच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत प्रेम होतं. मात्र ही चॅलेंजिंग पात्र सुद्धा त्यांनी अतिशय सुंदररित्या साकारले.

बंटी आणि बबली
https://www.indiatoday.in

2005 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी पोलिसाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील बऱ्याच दृश्यांमध्ये ते विडी ओढताना दिसले होते. पोलीस असल्यामुळे चोरां विषयी त्यांच्या मनात द्वेष आणि राग दाखवण्यात आला होता. या चित्रपटातील कजरारे या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या आणि मुलगा अभिषेक आणि खुद्द बच्चन यांनीसुद्धा या गाण्यात नृत्य केले आहे. या तिघांनाही एकत्र पाहण्याची चाहत्यांसाठी ही एक मोठी पर्वणीच होती. या चित्रपटातील राणी आणि अभिषेकची जोडी प्रेक्षकांनी चांगलीच खूप पसंद केली होती.

चीनी कम
https://hollywood-bollywood-movie-reviews.blogspot.comरोमँटिक कॉमेडी या प्रकारातील हा चित्रपट 2007 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सुद्धा त्यांना आपल्यापेक्षा वयाने तीस वर्ष लहान असणाऱ्या तब्बू सोबत प्रेम होतं. या चित्रपटात त्यांनी 64 वर्षांच्या अविवाहित पुरुषांची भूमिका साकारली आहे. आपल्याला ज्या मुलीवर प्रेम झालं आहे, तिच्या वडिलांना इंप्रेस करण्याचा प्रयत्न ते त्या चित्रपटात करताना दिसतात. या चित्रपटातील एक गमतीदार गोष्ट म्हणजे वयाने मुलीचे वडील बच्चन यांच्यापेक्षा वयाने लहान असतात. त्यामुळे अनेक गमतीदार प्रसंग या सिनेमात दाखवण्यात आले आहेत. अतिशय योग्य पद्धतीने अमिताभ यांनी या भूमिकेला न्याय दिला आहे.

पा
https://www.jiosaavn.comया चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची भूमिका खूपच आव्हानात्मक होती. खऱ्या आयुष्यातील त्यांचा मुलगा अभिषेक याच्या मुलाची भूमिका त्यांना चित्रपट साकारायची होती. मात्र त्यांनी हे आव्हान अगदी लीलया पेलले. त्यांच्या या कामाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या चित्रपटात त्यांनी एका अशा मुलाची भूमिका निभावली ज्या मुलांचे शरीर एका आजारामुळे लवकर म्हातारे होत जाते. या चित्रपटातील त्यांच्या लुकवर खूप मेहनत करण्यात आली होती. त्यांची मेहनत आणि लुकने या भूमिकेला चार चाँद लावले होते.

ब्लॅक
https://www.indiatoday.inया चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिकेची सर्व स्तरातून खूप मोठ्या प्रमाणात प्रशंसा झाली होती. एका प्राध्यापकाची भूमिका त्यांनी ज्या पद्धतीने या चित्रपटात साकारली, त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. या भूमिकेला त्यांच्याऐवजी दुसरा कुठलाही अभिनेता एवढ्या मोठ्या प्रमाणात न्याय देऊ शकला नसता.

पिकू
https://www.business-standard.comया चित्रपटात त्यांनी साकारलेलं पात्र त्यांच्याशिवाय इतर कोणताही कलाकार त्याच पदधतीने निभावेल याची खात्री देता येत नाही. या चित्रपटात त्यांचे त्यांच्या मुली सोबतचे नातं आणि त्यांच्यातील संवाद प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंद केले होते. या चित्रपटात त्यांना त्रास दाखवण्यात आला होता.
या सर्व चित्रपटात त्यांनी साकारलेली पात्र आजही आपल्या मनात घर करुन आहेत. तर यातील कोणतं पात्र तुमचं फेवरेट आहे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा.