रस्त्यावर धावत्या बाईकवर रोमांसचे किस्से काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. अशामध्ये आता पुन्हा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये होळीच्या रंगामध्ये रंगलेले कपल बाईकवरच रोमँटिक झालेले पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ राजस्थानची राजधानी जयपूरमधून समोर आला आहे. इथे एक कपल बुलेटवर रोमांस करताना पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर दोघे होळीच्या रंगामध्ये रंगलेले देखील आहेत. त्यांच्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताच लोक भडकले आहेत आणि त्यांच्यावर टीका करत आहेत.

वास्तविक हा व्हिडीओ अनेक युजर्सनी वेगवेगळ्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर शेयर केला आहे. यामध्ये दिसत आहे कि मुलगी बुलेटच्या पेट्रोलच्या टाकीवर बसली आहे आणि तिने माथामागे तोंड केले आहे. तर मुलगा पुढे तोंड करून बुलेट चालवत आहे. दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये पाहायला मिळत आहेत.

हा व्हिडीओ यामुळे चकती करणारा आहे कारण दोघे होळीच्या रंगामध्ये रंगलेले पाहायला मिळत आहे. याचा अर्थ असा झाला कि दोघे एकत्र होळी खेळत होते. हा व्हिडीओ इतका खतरनाक वाटत आहे कि जरा देखील चूक झाली तर दोघांना देखील दुखापत होऊ शकते. हा व्हिडीओ समोर येताच अनेक युजर्स त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

माहितीनुसार हा व्हिडीओ जवाहर सर्कल क्रॉसरोडचा आहे. यादरम्यान दोघांनी देखील हेलमेट देखील घातलेले नाही. असे म्हंटले जात आहे कि हा व्हिडीओ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत देखील पोहोचला आहे. तथापि दोघाचा शोध सुरु आहे. याआधी देखील अजमेर आणि लखनऊ मधून असे व्हिडीओ समोर आले आहेत. सध्या हा व्हिडीओ जयपूरमधून व्हायरल झाला आहे.