फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक स्टार किड्सनी बॉलीवूडमध्ये एंट्री घेतली आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान पासून ते मिथुन चक्रवर्तीची मुलगी दिशानी पर्यंत स्टार किड्स चित्रपट आणि अभिनयाचे शिक्षण घेत आहेत. सुहाना खानबद्दल तर आपण अनेक वेळा बोललो आहोत, पण आज आपण बोलत आहोत दिशानी चक्रवर्ती बद्दल. मिथुन आणि योगिता बालीची दत्तक घेतलेली मुलगी आहे दिशानी.अशी आहे दत्तक घेण्याची स्टोरी :- दिशानीचा जन्म होताच तिला कोणीतरी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून दिले होते. कोलकाता येथील एका स्वयंसेवी संस्थेने तिची मदत केली. दिशानीबद्दल दुसऱ्याच दिवशी वृत्तपत्रात बातमी छापून आली. तेव्हापर्यंत दिशानीची प्रकृती खूपच नाजूक सांगितली जात होती. जेव्हा मिथुन चक्रवर्ती आणि योगिता बालीने हि बातमी वाचली त्यावेळी त्यांनी दिशानीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.
सर्वात पहिला मिथुन आणि योगिता बालीने सर्व पेपर वर्क पूर्ण केले. तेव्हापासून आतापर्यंत मिथुन आणि योगिताने दिशानीला आपली मुलगी समजली आहे. त्यांच्या एका फॅन पेजनुसार दिशानीचे वय २४ वर्षे आहे आणि आपला वाढदिवस २४ ऑक्टोबरला साजरा करते, परंतु ती कोणत्या वर्षी जन्मली होती याची माहिती नाही.
अभिनयात देखील आहे रुची :- दिशांनी आपल्या आई-वडिल आणि मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत चालली आहे आणि तीचीसुधा अभिनयामध्ये तितकीच रुची आहे. जसे कि आम्ही आधीच सांगितले कि दिशानी अभिनयाचे शिक्षण घेत आहे पण तुम्हाला माहिती आहे का कि दिशांनी न्यूयॉर्क फिल्म अकादमी पासूनच अभिनयाचे शिक्षण घेत आहे जिथे सुहाना खान शिकली होती. तथापि दिशानी लॉस एंजिलिस कँम्पसमध्ये आहे.
दिशानीने आतापर्यंत शॉर्ट फिल्ममध्येच काम केले आहे. होली स्मोक या शॉर्ट फिल्ममधून तिच्या अभिनय करियरची सुरवात झाली होती जी तिचा भाऊ उश्मेय चक्रवर्तीने लिहिली आणि डायरेक्ट केली होती. यानंतर दिशानीने अंडरपास आणि सबटल एशियन डेटिंग विथ पीबीएम या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले. माहितीनुसार तिने करण जौहरचा चित्रपट स्टूडेंट ऑफ द इयर २ साठी ऑडीशन देखील दिले होते.
सोशल मिडियावर आहे मोठी फॅन फॉलोइंग :- दिशानीची सोशल मिडियावर खूप फॅन फॉलोइंग आहे. तिच्या इंस्टाग्रामवर ७० हजार फॉलोवर्स आहेत आणि त्याचबरोबर तिचे एक फेसबुक फॅन पेज देखील आहे. दिशानी तसे तर बराच काळ लाइमलाइटपासून दूर राहिली, पण गेल्या काही काळापासून ती सोशल मिडियावर खूपच अॅक्टिव्ह झाली आहे आणि तिच्या फोटोशूट्सचे फोटोदेखील खूपच व्हायरल होत असतात. दिशांनी एक डॉग लवर आणि फोटोग्राफर देखील आहे जिची माहिती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मिळते.
वडिलांसोबत आहे खास बाँडिंग :- फादर्स डेच्या इमोशनल पोस्ट पासून ते मिथुनच्या गार्डनिंगवाल्या फोटो पर्यंत दिशानीने अनेक वेळा दाखवले आहे कि ती आपल्या वडिलांच्या किती जवळ आहे. दिशानी चक्रवर्ती आपल्या कुटुंबाच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहे आणि आपण देखील अशा करूया कि तिला लवकरच एक चांगला डेब्यू मिळावा.