बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर अशी अभिनेत्री आहे जिने कौटुंबिक परंपरेच्या विरोधात जाऊन अभिनयात करिअर केले होते. अनेक उत्कृष्ठ चित्रपटांमध्ये अभिनेत्रीने काम केले करून आपली एक वेगळी ओळख बनवली. सध्या करिश्मा बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे, पण तरीही ती लग्झरी लाइफस्टाइल जगते. करिश्माच्या लाइफस्टाइलला पाहून प्रत्येकच्या मनामध्ये हा प्रश्न येतो कि ती चित्रपटांमध्ये आणि जाहिरातींमध्ये काम न करता घर खर्च कसा चालवते.
करिश्मा कपूर ब्रँड प्रमोशन करून बक्कळ पैसा कमवते. करिश्मा मुंबईमध्ये तिच्या मुलांसोबत राहते. करिश्मा तिच्या एक्स पतिने दिलेल्या पैशांमधून घर खर्च चालवते. करिश्माचा एक्स पती संजय कपूर घटस्फोटानंतर देखील त्याच्या मुलींची काळजी घेत आहे आणि त्यांना काहीच कमी पडू देत नाही. करिश्माचे करियर भलेहि शानदार राहिले पण तिच्या पर्सनल लाईडमध्ये नेहमी अडचणी आल्या. करिश्माने बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले पण नंतर दोघेही वेगळे झाले. करिश्माने मुलांच्या कस्टडीसाठी कायदेशीर लढा दिला होता.
करिश्मा कपूर आणि संजय कपूरच्या घटस्फोटाला बॉलीवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट म्हंटले जाते. करिश्माच्या पतीने तिला मुंबईमध्ये बंगला दिला होता, ज्यामध्ये सध्या अभिनेत्री आपल्या मुलांसोबत राहत आहे. माहितीनुसार संजय कपूर मुलांच्या खर्चासाठी १० लाख रुपये महिन्याला देतो. इतकेच नाही तर मुलांच्या नावाने १४ करोड रुपयांचे बाँड खरेदी केले होते, ज्याचे दर महिन्याला १० लाख रुपये व्याज येते.
करिश्माची मुले अंबानी स्कूलमध्ये शिकतात. करिश्मासोबतच्या घटस्फोटानंतर देखील संजय कपूर मुलांसोबत रिलेशनमध्ये आहे. मुले नेहमी त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी दिल्लीला जातात. संजय कपूरची दुसरी पत्नी प्रियाची देखील करिश्माच्या मुलांसोबत चांगली बॉडिंग आहे.
करिश्मा कपूर सिंगल मदर म्हणून आपल्या मुलांचा सांभाळ करत आहे. करिश्मा कपूर भलेहि चित्रपटांपासून दूर आहे पण अवॉर्ड्स फंक्शन आणि इवेंटमध्ये ती नेहमी पाहायला मिळते. करिश्मा नुकतेच मेंटलहुड वेब सीरिज़मध्ये दिसली होती. माहितीनुसार करिश्माचा अद्याप लग्नाचा कोणताही विचार नाही. तथापि अनेकवेळा तिच्या अफेयरच्या चर्चा ऐकायला मिळत असतात.