संपूर्ण देशामध्ये सध्या कोरोनामुळे लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे सामान्य लोकांसोबत कलाकर देखील आपल्या आपल्या घरामध्ये कैद आहेत. अशातच सर्व अभिनेता आणि अभिनेत्री सोशल मिडीयावर खूपच अॅक्टिव्ह झाले आहेत आणि आपल्या चाहत्यांसोबत आपले फोटो शेअर करत आहेत. बॉलीवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने असाच एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे जो तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे.बॉलीवुड अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे. माधुरी सोशल मीडियावर नेहमी आपले कोणतेना कोणते फोटो शेअर करत असते. यातच आता माधुरीने आपला एक थ्रोबॅक फोटो शेयर केला आहे. फोटो शेयर करत माधुरीने कॅप्शन मध्ये लिहिले आहे कि माझ्या बहिणीसोबत हि एक फेवरेट मेमरी आहे. आम्ही नेहमी शाळेच्या स्पर्धेमध्ये भाग घेत होतो. मी माझ्या फेवरेट डांस पार्टनर सोबत लहानपणाची एक थ्रोबॅक मेमरी शेअर करत आहे. तुमची लहानपणीची आवडती मेमरी काय आहे हे मला अवश्य सांगा.
माधुरीने शेयर केलेल्या या फोटोमध्ये तिला ओळखणे देखील खूपच कठीण आहे. अशामध्ये तुम्ही हा फोटो पाहून माधुरीला ओळखू शकलात का? या फोटो मध्ये दोन मुली पाहायला मिळत आहेत. एक आहे माधुरी दिक्षित आणि दुसरी तिची बहीण. फोटो पाहिल्यानंतर माधुरीला ओळखणे खूपच कठीण आहे. हा फोटो माधुरीच्या एका स्टेज परफॉर्मेंसच्या वेळेचा आहे.
फोटोच्या पुढच्या बाजूमध्ये माधुरीची बहीण दिसत आहे तर तिच्या ठीक माठीमागे माधुरी दिक्षित पाहायला मिळत आहे. दोघी इतक्या हुबेहूब दिसतात कि या फोटोमध्ये माधुरी कोणती आहे आणि तिची बहिण कोणती आहे हे ओळखता देखील येत नाही आहे. माधुरीचा हा थ्रोबॅक फोटो चाहत्यांना फार आवडत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडिया वर खूपच धुमाकूळ घालत आहे. माधुरीचा हा थ्रोबॅक फोटो तिच्या चाहत्यांना खूपच पसंत येत आहे. सध्या हा फोटो सोशल मिडियवर चांगलाच व्हायरल झाला आहे.