साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार महेश बाबू लॉकडाउनच्या या काळामध्ये आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. महेश बाबू भले ही फिल्मी बॅकग्राउंडचा आहे पण आपल्या मेहनतीने त्याने साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री नम्रता शिरोडकरने हिंदी चित्रपटानंतर तेलुगू चित्रपट वामसी साईन केला होता ज्यामध्ये तिचा हिरो म्हणून मुख्य भुमिकेमध्ये महेश बाबू होता.

याच चित्रपटामधून महेश बाबूने साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. आज नम्रता महेश बाबूची पत्नी आहे. तर महेश बाबू साउथच्या सर्वात जास्त फीस घेणाऱ्या सुपरस्टार्सपैकी एक आहे. इतकेच नाही तर त्याच्याजवळ स्वत:ची लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आहे. चला तर मग त्याच्या लक्झरी व्हॅनिटी व्हॅनबद्दल जाणून घेऊया. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट सीतम्मा वकितलो सिरिमले चेत्तु च्या दरम्यान त्यांने ही व्हॅन खरेदी केली होती. जिथे व्हॅन मध्ये महेश बाबू आपल्या घरा पेक्षा जास्त वेळ व्यतीत करतो. महेश बाबू जवळ जी व्हॅनिटी व्हॅन आहे तिची किंमत जवळजवळ ६.०२ करोड़ रुपये आहे. सध्या लॉकडाउनमुळे सगळेच आपल्या घरामध्ये आहेत. पण जेव्हा शुटींग चालू असते त्यावेळी महेश बाबूला याच व्हॅनमध्ये आराम भेटतो. महेश बाबूच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये दोन बेडरूम आहेत. फोटोमध्ये महेश बाबूची पर्सनल बेडरूम दिसत आहे. तसेच या बेडरूममध्ये लावलेला टीव्ही सेटदेखील सामान्य नाही. हा सॅटेलाइट टेलीव्हीजन आहे. ज्याद्वारे इंटरनेट अॅक्सेस केला जाऊ शकतो आणि इथे कोणत्याही देशाचे चॅनल्स पाहू शकतो. महेश बाबूच्या विशेष डिमांडवरून हा टीव्ही सेट लावण्यात आला आहे. एका बातमीवरून ही महेश बाबूची व्हॅनिटी व्हॅनमधील दुसरी रूम आहे. या व्हॅनिटीची तुलना चालत्या फिरत्या अलिशान घराशी करू शकता. तसेच या फोटोमध्ये तुम्ही महेश बाबूची मेकअप चेयर देखील पाहू शकता. व्हॅनिटी व्हॅनच्या या भागाला चालती फिरती ग्रीन रूमसुद्धा म्हणू शकता.