हि गोष्ट तर कोणापासून लपून राहिलेली नाही कि कमल हसनची मुलगी श्रुती हसन आणि तिचा बॉयफ्रेंड शांतनु हजारिका बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. नुकतेच हे कपल मुंबईमध्ये डिनर डेटवर गेले होते आणि यादरम्यान तिच्या कुटुंबातील काही सदस्य देखील दिसले होते.

अभिनेत्रीद्वारे शेयर केलेल्या व्हिडीओमध्ये डिनर डेटचा आनंद घेताना श्रुती हसनसोबत तिची आई सारिका हासनदेखील होती. यादरम्यान श्रुती, शांतनू आणि सारिकाने हसतमुखाने कॅमेऱ्यांसमोर पोज दिली. इंस्टाग्राम रीलमध्येही दोघेही एकमेकांची नजर हटवू शकले नाहीत आणि प्रेमात वेडे झालेले दिसत आहेत.

नुकतेच जेव्हा मुंबईच्या बांद्राच्या डिनर डेटवर स्पॉट झाले तेव्हा श्रुतीची आई सारिकादेखील आली होती. आईसोबत बॉयफ्रेंडला डिनर डेटवर नेलेल्या श्रुती हसनचा हा व्हिडीओ खूपच पाहिला जात आहे. या प्रसंगी जिथे श्रुतीने आपल्या आवडत्या ब्लॅक लुकला निवडले होते. तर शांतनू कॅज्युअल लुकमध्ये मस्त दिसत होता. तर कमल हसनची पत्नी सारिका हसनने डिनर डेटवर आउटफिट्सला मॅच करत ब्लॅक रंगाची साडी घातली होती.

नुकतेच श्रुती हसनने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एकत्रच अनेक फोटो शेयर केले होते. ज्यामध्ये ती आपल्या जवळच्या लोकांसोबत दिसत आहे. अभिनेत्रीने एक व्हिडीओ पोस्ट करत लिहिले आहे, सीरियस डिनर डेट. तिघे खूपच कमालीचे सुंदर दिसत होते. व्हिडीओ पाहून हे देखील स्पष्ट दिसत आहे कि सारिका देखील शांतनूसोबतच्या मुलीच्या रिलेशनवर खूप खुश आहे.

श्रुति हासन आणि शांतनू हजारिका साऊथमधील सर्वात चर्चित कपल्सपैकी एक आहे. अभिनेत्रीने खुलासा केला आहे कि २०१८ मध्ये ती त्याला भेटली होती आणि ती पहिल्यांदा प्रपोज करणार होती. श्रुती हसन विजुअल आर्टिस्ट संतनु हजारिकासोबतच्या रिलेशनवर खूप खुश आहे. लिव-इन कपल नेहमी अनेक इवेंट्समध्ये एकत्र दिसत आहेत.