मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णीने आपल्या वाढदिवशी चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. सोनालीने नुकताच आपला साखरपुडा उरकला असून याची घोषणा तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून केली आहे. सोनालीने २ फेब्रुवारी रोजी साखरपुडा केला होता. ज्या व्यक्तीसोबत सोनाली विवाह बंधनामध्ये अडकणार आहे त्या व्यक्तीचे नाव कुणाल बेडेकर असे आहे.आपल्या साखरपुड्याचे फोटो सोनालीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट वरून शेयर केले आहेत. यात तिने लिहिले आहे कि माझा वाढदिवस संपण्यापूर्वी मला एक गोड घोषणा करायची आहे. माझ्या होणाऱ्या पतीची तुमच्यासोबत ओळख करून द्यायची आहे. २ फेब्रुवारी रोजी आमचा साखरपुडा पार पडला होता. आमचा हा आनंद तुमच्यासोबत शेयर करण्याचा यापेक्षा चांगला दिवस दुसरा होऊच शकत नाही. आपले आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी असू द्या.
वाढदिवसाच्या एक दिवस आधी सोनालीने २ फेब्रुवारी २०२० ची एक पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केली होती. पण हि तारीख तिने आता का शेयर केली आहे याबद्दल तिच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आता त्याबद्दल योग्य खुलासा झाला आहे.
फेब्रुवारी महिन्यामध्येच सोनालीच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यावेळी सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला होता त्यावरूनच तिच्या लग्नाच्या चर्चांना उधान आले होते.
हिरकणी, धुरळा, विकी वेलिंगकर यासारखे एकापेक्षा एक सोनालीचे हिट चित्रपट रिलीज झाले. या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाचे चाहत्यांकडून भरभरून कौतुक झाले. याआधी सोनालीने आपण रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. आता तिच्या लग्नाच्या तारखेची घोषणा कधी होणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे. जे काही असो आमच्या टीमकडूनहि सोनालीला तिच्या पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा.