हे जग अनेक रहस्यमय गोष्टींनी भरलेले आहे. कित्येक हजारो वर्षांचा इतिहास यांमध्ये दडलेला आहे. मनुष्य आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक गोष्टींचा उपभोग घेत असतो, अनुभव घेत असतो. सतत नवनवीन गोष्टींबद्दल माहिती करून घेत असतो. मात्र तरीही अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टींपर्यंत मनुष्याला पोहोचणे शक्य होत नाही. ज्या गोष्टींची माहिती आजवर मनुष्यालाही नव्हती, त्या गोष्टी मनुष्यासाठी एका रहस्याप्रमाणेच असतात. आज विज्ञानाने अमाप प्रगती केली असली तरी जगातील काही रहस्य मानवाला अजूनही सोडवता आलेले नाहीत. त्या रहस्यांची माहिती मनुष्याला आजही नाहीये.

आज आम्ही तुम्हाला जगातील अकरा अशा रहस्यमय गोष्टींबाबत सांगणार आहोत. ज्या रहस्यमय गोष्टींचा शोध गुगल मॅपच्या माध्यमातून लागला होता. यातील बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, ज्या काही मोजक्याच लोकांना माहीत होत्या. बाकी उर्वरित जगाला त्याचा थांगपत्ता नव्हता. मात्र गुगल मॅपने या गोष्टी शोधून काढल्या आणि त्या संपूर्ण जगासमोर आल्या. त्यामुळे जगाला माहित नसलेल्या या रहस्यमय गोष्टी माहीत झाल्या आहेत.

१. जगभरात अनेक देश आहेत, या प्रत्येक देशात अनेक रहस्यमय घटना किंवा गोष्टी दडलेल्या आहेत. यांचा उलगडा मानवाने केला नसला तरी बदलत्या काळानुसार किंवा अनावधानाने का होईना त्यांचा उलगडा होत गेलेला आपल्याला पाहायला मिळते. अशाच प्रकारे एका रहस्याचा उलगडा झाला आहे. ही घटना आहे साऊथ अमेरिकी देश असलेल्या चिली मधली.. देशाच्या डोंगरांवर हा रहस्यमय प्रकार आढळून आला आहे. या डोंगरांवर कोको कोला या कंपनीचे विशाल काय चित्र पाहायला मिळाले आहे. सुरुवातीला हे चित्र पाहून अनेक जण अचंबित झाले होते. मात्र कालांतराने एक गोष्ट सर्वांच्या लक्षात आली. 1986साली कोकाकोला कंपनीला शंभर वर्ष पूर्ण झाली होती आणि या 100 वर्षांच्या पूर्ण झाल्याच्या आनंदात हे नाव तयार करण्यात आले होते. यासाठी तब्बल 70 हजार मोकळ्या बाटल्यांचा वापर करण्यात आला होता.

https://i.pinimg.com

२. गुगल मॅपच्या माध्यमातून अटलांटिका येथे एक रहस्यमय पिरॅमिड सापडला होता. प्रेमळ पिरॅमिड बर्फाने आच्छादलेले होता. मात्र कालांतराने एक गोष्ट लक्षात आली हा पिरॅमिड नसून डोंगर रांगा होत्या. ज्या डोंगरांवर मोठ्या प्रमाणात बर्फ साचले होते आणि या साचलेल्या बर्फामुळे त्याला पिरॅमिडसारखा आकार प्राप्त झाला होता.

https://m.vecernji.hr

३. गुगल मॅपचा अनेक गोष्टींसाठी आपल्याला उपयोग होत असतो. ट्रॅव्हल करताना एखादे ठिकाण शोधण्यासाठी, त्या ठिकाणाचे अंतर शोधण्यासाठी, आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या मार्गावर कुठे ट्राफिक आहे का? या व अशा विविध गोष्टींसाठी गुगल मॅप आपल्याला उपयोगी पडत असतो. मात्र या गुगल मॅपने आजवर अशा अनेक गोष्टी जगासमोर आणले आहेत ज्याची माहिती फार मोजक्याच लोकांना होती. गुगल मापने मोठमोठ्या गगनचुंबी इमारतींच्यामध्ये असलेल्या एका गोष्टीला जगासमोर आणले होते. हि गोष्ट म्हणजे दुसरे तिसरे काही नसून गगनचुंबी इमारतींच्या मध्ये अडकलेले एक महाकाय क्रूज जहाज होते. हे क्रूज जहाजाच्या स्वरूपात असलेले हॉंगकॉंगचे एक प्रसिद्ध शॉपिंग सेंटर आहे विशेषतः रात्रीच्या सुमारास अतिशय मनमोहक दिसते.

https://spi2.itvnet.lv

४. इंग्लंड या देशात विविध रहस्य दडलेली आहेत. अनेक अशा गोष्टी दडलेल्या आहेत, ज्या फार कुणालाही माहिती नाहीत. याचा उलगडा फार काळाने झाला. ही गोष्ट आहे इंग्लंडच्या हेंप शायर काउंटी येथील. येथे विशाल काय पायांचे ठसे आढळून आले होते. मात्र कालांतराने हे विशाल काय पायांचे ठसे म्हणजे एक प्रकारची भुलभुलय्या होती काही कालांतराने निष्पन्न झाले.

https://spiderimg.amarujala.com

५. एका इमारतीच्या छतावर विशाल काय व्यक्ती पडली होती, हे पाहून सर्व घाबरले होते. ही व्यक्ती कोण आहे आणि तिथे काय करत आहे याची सर्वांना उत्सुकता लागली होती. प्रत्येक जण याबाबत तर्कवितर्क लढवत होते. मात्र त्याबाबत कोणालाही माहिती उपलब्ध होत नव्हती. गुगल मॅपच्या माध्यमातूनच ही गोष्ट समोर आली होती. मात्र कालांतराने ही कोणी व्यक्ती नसून एका इमारतीच्या छतावर बनवलेली व्यक्तीची प्रतिकृती आहे हेच सिद्ध झाले होते.

https://spiderimg.amarujala.com

६. आटाकामा वाळवंटात एक असे चिन्ह गुगल मॅप द्वारे जगासमोर आले होते, त्याची मोठ्या प्रमाणात जगभरात दहशत पसरली होती. एखाद्या प्राण्याच्या सारखे दिसणारे चिन्ह असल्यामुळे ते काढण्यामागे नक्की काय हेतू असावा याचा उलगडा होत नव्हता. हे चिन्ह एखाद्या मांजरीसारखे दिसणारे आहे.

https://img-peco.ucweb.com/

७. अमेरिकेतील एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात विमान एकत्र स्वरूपात पडली होती. त्यामुळे जगभरात अनेक चर्चाना उधाण आले होते एकाच ठिकाणी पडलेल्या या सगळ्या विमानांचा नेमका अर्थ काय? याचे उत्तर कोणाकडेही नव्हते. मात्र अमेरिका खराब झालेल्या किंवा वापरात नसलेल्या विमानांना याठिकाणी जमा करत असल्याचे उघड झाले.

https://rayanworld.com

८. तुर्कीच्या पर्वतरांगांमध्ये तुर्कीचा विशाल आकाराचा झेंडा सापडला होता. हा झेंडा खास करून बनवण्यात आला होता. तुर्कीच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हा झेंडा बनवण्यात आला होता.

http://img.mp.itc.cn

९. अटलांटिका आणि साऊथ अमेरिका भौगोलिकदृष्ट्या कितीही जवळ असले तरीही एका छोट्याशा भूभागातील अंतरामुळे या दोन देशांना वेगळे केले आहे. अनेकांना या भूभागाविषयी माहिती नव्हती. गुगल मॅपच्या माध्यमातूनच ही माहिती जगासमोर आली आहे.

http://mensup.ru

१०. समुद्रात अनेक रहस्ये दडलेली आहे किंबहुना समुद्राने अनेक रहस्य सामावून घेतलेली आहेत. ज्यांचा उलगडा आजवर झालेला नाही. अशाच प्रकारे समुद्रात एक भलामोठा मानवी पुतळा तरंगताना पाहिला गेला होता. ऑस्ट्रेलियातील ही घटना होती. मात्र नंतर लक्षात आले की मानवानेच तो तयार करून समुद्रात सोडला होता. हा महाकाय पुतळा समुद्रात का सोडला,याचे कारण मात्र अद्याप कळू शकलेले नाही. गुगल मॅपच्या माध्यमातूनच ही गोष्ट समोर आली होती.

dailyhunt.in

११. गुगल मॅपच्या माध्यमातूनच एका महाकाय खेकड्याला पाहिले गेले होते. व्हिटस्टेबल केंटचा तटावर याला पहिल्यांदा आणि शेवटचे पाहिले गेले. ज्याची लांबी जवळ बस 50 मीटर एवढी होती तेव्हापासून आजतागायत हा खेकडा पुन्हा कधीही दिसला नाही. त्यामुळे या खेकड्याला क्रैबज़िला हे नाव देण्यात आले.

https://liked.hu