बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन जगदीप जाफरी यांचे ८१ व्या वर्षी निधन झाले. अभिनेता जगदीप अनेक आजारांनी ग्रस्त होते आणि त्यांच्यावर बराच काळ उपचार सुरु होते. यादरम्यान बुधवारी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

गुरुवारच्या सकाळी जगदीप म्हणजेच सैय्यद इश्तियाज अहमद जाफरी यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत आपल्या करियरच्या दरम्यान त्यांनी ४०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आणि दर्शकांचे मनोरंजन केले. शोलेमध्ये साकारलेल्या सूरमा भोपाली या भूमिकेमुळे त्यांना खूपच लोकप्रियता मिळाली. शोलेशिवाय जगदीप जाफरी मुन्ना, लैला मजनू, अंदाज अपना-अपना, खूनी पंजा आणि मोर्चा सारख्या चित्रपटांमध्ये देखील पाहायला मिळाले.जगदीप जाफरीच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर जगदीप जाफरीने ३ लग्न केले होते. अभिनेटा जगदीप यांचे पहिले लग्न नसीम बेगम सोबत झाले तर दुसऱ्या पत्नीचे नाव सुघ्र बेगम आणि तिसऱ्या पत्नीचे नाव नजीमा आहे.जगदीप जाफरी यांना ६ मुले आहेत. ज्यामध्ये त्यांच्या पहिला पत्नीपासून हुसैन जाफरी, शकीरा शफी आणि सुरैया जाफरी हि मुले आहेत. तर दुसऱ्या पत्नीपासून जावेद जाफरी आणि नावेद जाफरी अशी मुले आहेत याशिवाय तिसऱ्या पत्नीपासून त्यांना एक मुलगी मुस्कान आहे.जावेद जाफरी आणि नावेद जाफरी आज बॉलीवूडमधील प्रसिद्ध नावे आहेत. जावेद जाफरी देखील आपल्या वडिलांच्या स्टाईलसाठी ओळखला जातो.
जावेद जाफरीला डांसिंग शो बूगी-वूगी पासून विशेष ओळख मिळाली होती, ज्यामध्ये तो या शोच्या होस्टच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय जावेदने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. धमाल चित्रपटाच्या सिरीयलमधील त्याच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.