जाणून घ्या ५जी इंटरनेट आल्यानंतर कसं बदलेल तुमचं जीवन? संपूर्ण माहिती !

4 Min Read

मित्रांनो तुम्ही आतापर्यंत २जी वापरलंत , ३जी वापरलंत आणि आता ४जी वापरत आहात. भारतात ४जी सेवा येण्यास भरपूर कालावधी लागला. आता ५जी च्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आपला शेजारी देश चीन ५जी टेक्नॉलॉजी आणण्यासाठी जोमाने काम करतो आहे. २०२० पर्यंत चीन मध्ये ५जी सेवा सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. चला पाहुयात ५जी च्या येण्याने आपल्या आयुष्यात किती मोठे बदल घडून येतील.

५जी सेवा अनेक बाबतीत आतापर्यंतच्या सर्व इंटरनेट च्या तुलनेने सर्वात श्रेष्ठ सिद्ध होईल. ह्याला मेसेज रिसिव्हर वर पोहोचे पर्यंत खूप कमी वेळ लागेल त्यामुळे कठीण गोष्टी सोप्प्या होतील ज्या कमी स्पीड मुळे शक्य होत नसायच्या. ह्यालाच तांत्रिकी भाषेत लेटेन्सी असेही म्हणतात. म्हणजेच ५जी मध्ये लेटेन्सी खूप कमी असेल, कमी कसली नसल्या जवळ असेल. ह्याचा उपयोग सेल्फ ड्रायविंग वाहनांमध्ये अचूकरीत्या होऊ शकतो. अश्या गाड्या रस्त्यांवर एकमेकांशी जोडल्या गेल्या असतात आणि लेटेन्सी कमी असल्यामुळे वाहनाला वेग कधी कमी करावा, केव्हा वाहन वळवावे, केव्हा ब्रेक मारावा अश्या क्रिया रियल टाइम मध्ये अचूक रित्या करता येतात.५जी सेवेचा AR आणि VR क्षेत्रातही चांगला उपयोग होणार आहे. तुम्ही घरबसल्या एक लाईव्ह इव्हेंट VR बॉक्स वापरून अटेंड करू शकाल. अगदी समोर लाईव्ह दृश्य घडत आहेत असा अनुभव घेता येईल. तांत्रिकी शब्दात सांगायचं झालं तर ४जी चा स्पेक्ट्रम ३ गिगाहर्टझ वर आहे तर ५जी चा स्पेक्ट्रम ३० गिगाहर्टझ वर असेल. ४जी चा कमीत कमी स्पीड १GB प्रति सेकंद आहे तिथे ५जी चा स्पीड २०GB प्रति सेकंद असेल. त्यामुळे एकाच वेळेला अनेक उपकरणे तुम्ही इंटरनेट शी जोडू शकाल आणि वेगावर ही परिणाम होणार नाही.५जी च्या मदतीने हेवी मशिनरीचा दूर वरून वापर केला जाऊ शकेल. रिमोट सर्जरी मुळे डॉक्टर लांब असून सुद्धा शस्त्रक्रिया करू शकतील. ५जी च्या मदतीने एकाच वेळेस अनेक उपकरणे आरामात चालवली जाऊ शकतील. ५जी च्या वेगाचं म्हणाल तर ३०० MB चे ७५ फोटो २ सेकंद आणि ५GB ची सिरीज ८ सेकंद आणि १०५ GB चा बॅकअप ६० सेकंदात डाउनलोड करू शकता. ५जी आतापर्यंतचे सर्वात जलद इंटरनेट असेल.

पण ५जी भारतात येणार कधी? ५जी ला भारतात यायला अजून बराच कालावधी जावा लागेल. कारण ५जी चं जाळं बसवणं तेवढं सोप्प काम नसेल आणि खर्चिक ही असेल. ३जी मधून ४जी मध्ये अपग्रेड करण्यासाठी केवळ टॉवर अपग्रेड करावे लागले होते. आणि टॉवर्स ची रेंज ३० किलोमीटर्स पर्यंत असलेली चालत होती. ह्यावेळेला प्रत्येक ३०० मीटर वर ५जी चा रिसिव्हर बसवावा लागेल जे एकमेकांशी जोडलेले असतील. कारण ५जी च्या वेव्हस जास्त अंतरापर्यंत प्रवास करू शकत नाहीत कारण हे छोटे व्हेव्स असतात आणि आरामात तुटू शकतात.आता ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर एक गोष्ट समजून येते कि ५जी भारतात यायला वेळ लागेलच. पण काही कंपन्यांनी ५जी चे परीक्षण सुरु केले आहे. आजपासून २-३ वर्षांत आपल्याला ५जी सेवेचा आनंद घेता येईल अशी आशा करता येईल. इन्फ्रास्ट्रक्चर चा खर्च अधिक असल्यामुळे सुरुवातीला ५जी सेवा महाग असण्याची शक्यता आहे. पण जास्त कालावधीसाठी घेतल्यास ५जी सेवा स्वस्त दरात मिळू शकतील. आता बाजारात ५जी सेवा असलेले फोन्स ही मिळू लागले आहेत. अनेक कंपन्या आपली ५जी सेवा भारतात आणण्यासाठी उत्सुक आहेत कारण भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक स्मार्टफोन उपभोक्ता असलेला देश आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *