हिंदी चित्रपटामध्ये अनेक अभिनेत्रींनी खऱ्या आयुष्यामध्ये गर्भपाताचे दुख झेलले आहे. बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री या वाईट काळामधून गेल्या आहेत. यामध्ये मोठ मोठी नावे सामील आहेत. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना गर्भपाताचे दुख सहन करावे लागले आहे.
काजोल: काजोल हिंदी चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने एका मुलाखतीदरम्यान आपल्या गर्भपाताबद्दल खुलेपणाने सांगितले होते. काजोलला एकदा नाही तर दोन वेळा याचा सामना करावा लागला होता. कभी खुश कभी गम चित्रपटाच्या वेळी तिला पहिल्यांदा याचा सामना करावा लगला होता तर त्यानंतर पुन्हा एकदा असे झाले होते. यानंतर ती दोन मुलांची आई बनली.
कश्मीरा शाह: कश्मीरा शाह प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल कि कश्मीरा एकदा नाही तर १४ वेळा प्रेग्नंट राहिली आहे. १४ वेळा प्रेग्नंट राहिल्यानंतर देखील ती तिच्या बाळाला जन्म देऊ शकली नाही. एका मुलाखतीदरम्यान कश्मीरा म्हणाली होती कि मी फॅमिली प्लानिंगसाठी माझ्या कामाला देखील बाजूला ठेवले होते. अनेकवेळा प्रयत्न केले पण फेल झाले. वारंवार गर्भपात झाल्यामुळे माझ्या प्रकृतीवर वाईट परिणाम होऊ लागला होता. नंतर आम्ही सरोगेसीची मदत घेतली आणि दोन मुलांचे आईवडील झालो.
शिल्पा शेट्टी: हिंदी चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीने २००९ मध्ये राज कुंद्रासोबत लग्न केले होते. लग्नानंतर जेव्हा शिल्पा शेट्टी प्रेग्नंट राहिली तेव्हा तिचे बाळ या जगामध्ये येऊ शकले नाही. कारण तिचा गर्भपात झाला होता. पण २०१२ मध्ये शिल्पाने मुलगा विआनला जन्म दिला. यानंतर त्यांनी दुसऱ्या मुलाची प्लानिंग केली. पण तिला पुन्हा तेच सहन करावे लागले. तथापि सरोगसीद्वारे ती दुसऱ्यांदा मुलगी समीशाची आई बनली.
महिमा चौधरी: परदेस गर्ल म्हणून ओळखली जाणारी महिमा चौधरी एका मुलीची आई आहे. तिच्या मुलीचे नाव अर्याना चौधरी आहे. अर्यानाच्या जन्मापूर्वी महिमाला दोनवेळा गर्भपाताचा त्रास सहन करावा लागला होता. नुकतेच महिमा ब्रेस्ट कॅन्सरवर मात करण्यासाठी चर्चेत आली होती.
अमृता राव: अमृता रावने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमृताने कोणत्यातरी कारणामुळे सेरोगेसीद्वारे आई बनण्याचा निर्णय घेतला होता. पण तिचा गर्भपात झाला. तथापि ती शेवटी आई बनण्यात सफल झाली होती. आता अमृता राव एक मुलाची आई आहे.
गीता बसरा: गीता बसरा ही माजी भारतीय क्रिकेटर हरभजन सिंगची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री आहे. दोघे एक मुलगा आणि एक मुलगीचे आईवडील आहेत. पहिला गीताने मुलीला जन्म दिला होता. नंतर तिला दोनवेळा गर्भपाताचा त्रास सहन करावा लागला होता ज्यानंतर तिने मुलाला जन्म दिला.
रश्मि देसाई: टीव्ही इंडस्ट्रीमधी प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने २०१२ मध्ये अभिनेता नंदिश संधूसोबत लग्न केले होते आणि २०१६ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. दोघांची एक मुलगी आहे पण मुलीच्या जन्मापूर्वी एकदा रश्मीला गर्भपाताला सामोरे जावे लागले होते.