८ बॉलीवुड कपल्स ज्यांनी घरातून पळून जाऊन केले लग्न, नंबर ५ आणि ६ चे कपल्स पाहून तर दंग व्हाल !

5 Min Read

प्रेक एक खास भावना असते आणि ज्याला प्रेम होते त्याची लाईफ पूर्णपणे बदलून जाते आणि दोन प्रेम करणारे आपले प्रेम मिळवण्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. मग यासाठी आपल्या आईवडिलांविरुद्ध जावे लागले तरीही. असे सामान्य लोकांसोबतच होत नाही तर सेलेब्रिटींना देखील आपले प्रेम मिळवण्यासाठी घराचा त्याग करावा लागला. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलीवूड आणि टीव्ही कपल्सबद्दल सांगणार आहोत ज्यांनी घरातून पळून जाऊन लग्न केले.

आमिर खान आणि रीना दत्ता :- बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने रीनासोबत पळून जाऊन लग्न केले होते. रीना त्याच्या शेजारी राहत होती. जेव्हा आमिर २१ वर्षांचा झाला तेव्हा रीनाला त्याने प्रपोज केले. पण धर्म वेगळा असल्यामुळे रीनाच्या घरच्यांनी याचा विरोध केला पण असे असून देखील दोघांनी घरातून पळून जाऊन १८ एप्रिल १९८६ रोजी लग्न केले. यांना दोन मुले जुनैद आणि ईरा झाली पण लग्नाच्या १६ वर्षानंतर या जोडीने नाते तोडण्याचा निर्णय घेतला. आता आमिर किरण रावचा पती आहे आणि त्यांना एक मुलगा आहे.बिंदिया गोस्वामी आणि जेपी दत्ता :- जुन्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री बिंदिया गोस्वामी आणि जेपी दत्ता ज्यांनी गोलमाल आणि शान सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे त्यांचे लग्न देखील खूप गुंतागुंतीचे होते. त्यांनी पहिला विनोद मेहरासोबत लग्न केले (जे त्यावेळी मीना ब्रोकचे पती होते) तथापि बिदिंयाचे पॅरेंट्स या नात्याच्या विरुद्ध होते. पण त्यांनी सर्वांच्या विरुद्ध जाऊन लग्न केले. पण हे नाते जास्त काळ टिकले नाही, नंतर बिंदियाला डायरेक्टर जेपी दत्तावर प्रेम झाले आणि नंतर तिने जेपी दत्तासोबत लग्न केले.शशि कपूर आणि जेनिफर केंडल :- प्रसिद्ध दिवंगत अभिनेता शशि कपूरची भेट जेनिफरसोबत कोलकातामध्ये १९५६ मध्ये झाली, जेव्हा ते आपल्या आपल्या थियेटर ग्रुप्स, पृथ्वी थियेटर आणि शेक्सपियरेना ग्रुपमध्ये काम करत होते. काही भेटींनंतर त्यांना एकमेकांवर प्रेम झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण जेनिफरचे वडील या नात्यावर खुश नव्हते, पण असे असून देखील जेनिफर मुंबईला आली आणि त्यांनी जुलै १९५८ मध्ये पारंपरिक रीति-रिवाजाने लग्न केले. १९८४ मध्ये कर्करोगामुळे जेनिफरचे निधन झाले ज्यानंतर शशि कपूर पूर्णपणे खचले.शम्मी कपूर आणि गीता बाली :- कपूर कुटुंबाची शान राहिलेले दिवंगत अभिनेता शम्मी कपूरला गीता बालीवर रंगीन रातें च्या सेटवर प्रेम झाले. चार महिन्याच्या कालावधीनंतर गीता बालीने शम्मी कपूरला लग्नासाठी होणार दिला. पण गीता बाली शम्मी कपूरपेक्षा एका वर्षाने मोठी होती, यामुळे शम्मी कपूरला वाटत होते कि त्यांचे कुटुंबीय या नात्याला मंजुरी देणार नाहीत यामुळे त्यांनी पळून जाऊन लग्न केले. पण नंतर स्मॉलपॉक्समुळे गीताचे १९६५ मध्ये निधन झाले.पद्मिनी कोल्हापुरी आणि प्रदीप शर्मा :- आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी प्रदीप शर्माला तेव्हा भेटली जेव्हा त्यांनी ऐसा प्यार कहां चित्रपटासाठी तिला साईन केले होते. लवकरच दोघांना एकमेकांवर प्रेम झाले, पण त्यांनी हि गोष्ट पब्लिकपासून लपवून ठेवली. पद्मिनी कोल्हापुरीचे पॅरेंट्स या नात्यासाठी तयार नव्हते, कारण प्रदीप त्यांच्या कम्युनिटी मधून नव्हता. जेव्हा पद्मिनीचे आईवडील या नात्यासाठी तयार झाले नाहीत तेव्हा तिने आपल्या प्रोड्यूसर बॉयफ्रेंड सोबत पळून जाऊन १४ ऑगस्ट १९८६ रोजी लग्न केले.भाग्यश्री पर्टवर्धन आणि हिमालय दसानी :- मैंने प्यार किया फेम भाग्यश्री फक्त २१ वर्षांची होती जेव्हा तिने हिमालय दसानीसोबत लग्न केले होते. दोघांना शाळेच्या दिवसांमध्ये एकमेकांवर प्रेम झाले होते. शाळेच्या ट्रीपदरम्यान हिमालयने भाग्यश्रीला प्रपोज केले आणि तिने होकार दिला. भाग्यश्री सांगलीच्या शाही मराठी कुटुंब पटवर्धन घराण्याची मुलगी होती आणि तिचे वडील सांगलीचे राजा होते. यामुळे ते या लग्नाच्या विरुद्ध होते, पण दोघांनी पळून जाऊन लग्न केले.शक्ति कपूर आणि शिवांगी कोल्हापुरी :- बॉलीवूड चित्रपटांमध्ये विलेन बनून घाबरवणारे अभिनेता शक्ति कपूर आणि शिवांगी कोल्हापुरीने एकमेकांना दोन वर्षे डेट केले. जेव्हा त्यांनी आपल्या नात्याबद्दल कुटुंबियांना सांगितले तेव्हा त्यांनी यासाठी नकार दिला त्यामुळे त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १९८२ मध्ये कोर्ट मॅरिज केले.
गुरमीत चौधरी आणि देबिना बैनर्जी :- फेमस टीव्ही कपल गुरमीत आणि देबिनाने पळून जाऊन लग्न केले होते. त्यांचे ऑफिशियल मॅरिज १५ फेब्रुवारी २०११ मध्ये कुटुंबियांचा उपस्थितीमध्ये झाले होते, पण खूपच कमी लोकांना माहिती होते कि त्यांनी २००६ मध्ये लग्न केले होते. पण त्यांच्या पॅरेंट्सला देखील या लग्नाबद्दल माहिती नव्हते. एका मुलाखतीमध्ये गुरमीतने सांगितले होते कि लोकांना वाटते कि मी देबिनासोबत रामायणच्या शुटींगदरम्यान भेटलो आणि आम्ही २०११ मध्ये लग्न केले. पण हे कोणालाही माहिती नव्हते कि जेव्हा आम्ही काहीही नव्हतो तेव्हा कामाच्या शोधात होतो आणि आमचे वय १९ आणि २० वर्षे होते, तेव्हा आम्ही पळून जाऊन २००६ मध्ये लग्न केले होते. आमच्या फ्रेंड्सने लग्नासाठी मदत केली होती आणि आम्ही गोरेगावच्या एका मंदिरामध्ये लग्न केले होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *