बॉलीवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानची मुलगी इरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड यांच्या ब्रेकअपच्या बातम्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात येत आहेत. इरा खान गेल्या २ वर्षांपासून मिशाल कृपलानीसोबत रिलेशनशिप होती. अनेक वेळा ती मोठ मोठ्या इवेंटमध्ये विशालसोबत पाहायला मिळाली होती. दोघेही नेहमी आपले प्रेम सोशल मिडियावर व्यक्त करताना पाहायला मिळत होते. तथापि आता अशा बातम्या समोर येत आहेत कि दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत आणि त्यांचे ब्रेकअप झाले आहे.मिडियाच्या बातमीनुसार मिशाल कृपलानी आणि इरा खान यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. दोघांनी एकमेकांना भेटणेदेखील बंद केले आहे. रिपोर्टमध्ये हे सांगितले जात आहे कि जेव्हापासून इराने आपल्या करियरफर फोकस करायला सुरवात केली तेव्हापासून त्यांच्या नात्यामध्ये मतभेद निर्माण होऊ लागले होते.
याकारणामुळे दोघांनीहि वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. इरा खानने काही दिवसांपूर्वी बोल्ड फोटोशूट केले होते. यामध्ये तिच्यासोबत तिची मैत्रीण देखील पाहायला मिळाली होती. इराचे हे फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाले होते. या फोटोंमधील इराच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अवतरामुळे ती खूपच चर्चेमध्ये राहील होती.इरा खान आपल्या करियर वर लक्ष केंद्रित करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. तर तिचा बॉयफ्रेंड मिशाल कृपलानी सुद्धा आपल्या म्युजिक करियर वर फोकस करत आहे. अमीर खानची मुलगी इरा खान केवळ २३ वर्षांची असून दिसायला ती खूपच सुंदर आहे ग्लॅमरस आहे. इराचे अनेक फोटो सोशल मिडियावर नेहमी व्हायरल होत असतात. इरा खान अमीर खानची पहिली पत्नी रीना दत्ताची मुलगी आहे.