बॉलीवूड अभिनेता सलमान खानसोबत प्रेम रतन धन पायो चित्रपटामध्ये आणि मीरा, परवरिश सारख्या टीव्ही शोमध्ये पाहायला मिळालेली अभिनेत्री आशिका भाटिया बऱ्याच काळापासून फिल्मी दुनियेपासून दूर आहे आणि याचे कारण तिच्या अपघातानंतर झालेली सर्जरी आहे. सोशल मिडियावर आशिकाची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.नुकतेच ईटाइम्स टीव्हीसोबत बातचीत दरम्यान हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला कि तिचे क्वॉरंटीन दिवस कसे जात आहे आणि लाईफमध्ये सध्या काय चालू आहे. आशिकाने सांगितले कि तिने आपले काम सोडलेले नाही तर वर्षापूर्वी तिचा एक अपघात झाला होता ज्यानंतर तिला आपल्या गुडघ्याची सर्जरी करावी लागली होती तेव्हापासून तिचे काम पूर्णपणे थांबले आहे.ती पुढे म्हणाली कि मी माझे काम खूप मिस करते. तथापि तिने सांगितले कि आता माझा पाय पूर्णपणे बारा झाला आहे पण कधी कधी खूपच वेदना होतात. होय नक्कीच मला माझ्या फिल्डमध्ये पुन्हा परत जायचे आहे आणि मी सुरवात देखील केली होती आणि मला हे काम खूपच पसंत आहे. अभिनय माझे पॅशन आहे आणि मला ते कधीच सोडायचे नाही. टिक टॉकने मला एक चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे आणि याच्या मदतीने मला माझ्या फॅन्सला इंटरटेन करायला खूप आवडते.जवळ जवळ ३ वर्षापासून मी या प्लॅटफॉर्मसोबत जोडली गेली आहे. मी यावर व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली आणि माझ्या फॅन्सला ते खूप आवडू लागले. मजेदार व्हिडिओ बनवणे खूपच कुल वाटते आणि मला याची ख़ुशी आहे. फॅन्सकडून मिळालेले प्रेम आणि सपोर्टमुळे मला हे सुरु ठेवण्यास पाठबळ मिळाले आहे.काही काळापूर्वी आशिकाचे रोशन गुप्ता सोबत रिलेशन असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या ज्याबद्दल तिने सांगितले कि आम्ही डेटिंग करत नाही आहोत तर एक चांगले फ्रेंड्स आहोत. तो माझ्यासाठी खूपच महत्वाचा आहे. हे नेहमी लक्षात ठेवा कि आमच्यामधील प्रत्येकजण जसा आहे तसा खूप सुंदर आहे. याला तुमच्यापासून कोणी दूर करू शकत नाही. हेच चांगले राहील कि आपल्या मनाच्या शांतीसाठी लोकांना इग्नोर करा. तर फक्त खुश रहा आणि लक्षात ठेवा कि तुम्ही जसे आहात तसे खूप सुंदर आहात.