सुपरस्टार सलमान खानला करियरच्या उच्च शिखरावर पोहोचवनारा चित्रपट मैंने प्यार किया ला आज जवळजवळ ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटामधून भाग्यश्रीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटामुळे दोघेही रातोरात स्टार बनले होते, त्यावर्षी हा चित्रपट सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला होता. हा चित्रपट हिंदीशिवाय इतर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

नुकतेच अनेक वर्षांनंतर या चित्रपटाशी संबंधित एक रंजक किस्सा समोर आला आहे. ज्याचा खुलासा भाग्यश्रीच्या मुलाने केला आहे. अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यूने सांगितले कि चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बड़जात्याने भाग्यश्रीने या चित्रपटाला होकार देण्याअगोदर जवळजवळ एक महिना तिचा पाठलाग केला होता.अभिमन्यूने सांगितले कि चित्रपटाशी संबंधित हे तथ्य कोणालाही माहिती नव्हते कि सुरज बड़जात्याने या चित्रपटासाठी माझ्या आईला हो म्हणण्यासाठी सतत एक महिना प्रयत्न केले होते. मला पण असे वाटते कि मी सुद्धा इतका नशीबवान बनावे कि आपल्यालासुद्धा चित्रपटांमध्ये कास्ट करण्यासाठी निर्मात्यांनी असेच माझ्या मागे लागावे. हि एक अप्रतिम भावना आहे.गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण झाली होती. यानिमित्ताने अभिमन्यूने आपल्या आईचा डेब्यू चित्रपट सोशल मिडियावर रिक्रियेट केला होता. मैंने प्यार किया संबंधित काही रंजक बाबींबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट दर्शकांना इतका पसंत आला होता कि चित्रपटाशी संबंधित अनेक वस्तू नंतर विकल्या गेल्या.

चित्रपटामध्ये सलमान खानने एक खास काळ्या रंगाचा जॅकेट परिधान केला होता, सूरज बड़जात्याला याची कल्पना हॉलीवुड अभिनेता टॉम क्रूजचा चित्रपट टॉप गन मधून मिळाली होती. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, संगीत दिग्दर्शक, गायक सारखे जवळ जवळ ६ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते.