बॉलीवूडमधील किस्से कधीच थांबत नाही. नेहमी कलाकारांचे ब्रेकअप-पॅच-अप होत राहतात. यादरम्यान आपण एका अशा अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने स्वतःपेक्षा मोठ्या वयाच्या मॉडलसोबत लग्न केले आणि २० वर्षे त्यांचे नाते टिकले देखील पण नंतर अभिनेत्याचे स्वतःपेक्षा १५ वर्षाने लहान मॉडलसोबत अफेयर सुरु झाले.

ती मॉडल अभिनेत्यासोबत लिव-इनमध्ये राहू लागली आणि काही दिवसांनंतर तो लग्न न करताच बाप झाला. आम्ही इथे ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत त्याचे नाव अर्जुन रामपाल आहे. बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपालने आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि काही निवडक चित्रपट केल्यानंतर देखील त्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.

अर्जुन रामपाल त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे खूप चर्चेमध्ये राहिला. अर्जुन रामपालच्या लुकमुळे त्याच्यावर अनेक तरुणी फिदा होत्या. पण जेव्हा तो एक सफल अभिनेता बनला नव्हता तेव्हा त्याने स्वतःपेक्षा काही वर्षे मोठ्या सुपरमॉडल आणि पूर्व मिस इंडिया मेहर जेसिया सोबत लग्न केले होते.

१९९८ मध्ये मेहर जेसियासोबत लग्न केल्यानंतर तो दोन मुली मायरा आणि माहिकाचा पिता बनला होता. अर्जुन रामपालचे लग्न २० वर्षे टिकले आणि नंतर दोघे वेगळे झाले. मेहरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अर्जुन दक्षिण अफ्रिकाची मॉडल गॅब्रिएला डिमेट्रेड्सच्या प्रेमात पडला. यानंतर दोघे लिव इनमध्ये राहू लागले. या नात्याच्या काही काळानंतर गॅब्रिएला अर्जुनच्या मुलाची आई बनली. ज्याचे नाव एरिक आहे. पण खास गोष्ट हि आहे कि गॅब्रिएला आणि अर्जुनचे लग्न झालेले नाही.

गॅब्रिएलासोबत रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर अर्जुन रामपाल खूपच कमी पब्लिकमध्ये दिसू लागला, पण तो आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर नेहमी सक्रीय राहतो. जर तुम्ही त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट पाहिले तर समजेल कि तो आपल्या मुलांवर किती प्रेम करतो. नेहमी तो आपल्या मुली आणि मुलासोबत फिरायला जातो.
अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो धाकड चित्रपटामध्ये शेवटचा पाहायला मिळाला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. यानंतर तो बॅटल ऑफ भीमा कोरेगाव चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर तो नास्तिक चित्रपटाच्या शुटींगमध्ये देखील व्यस्त आहे.