फिल्मी दुनियेत तुम्ही बर्‍याच चित्रपटांमध्ये पाहिले असेलच की कलाकारांना धोकादायक स्टंट्स करावे लागतात. काही हौशी कलाकार मंडळी हे स्टंट स्वत: देखील करतात. परंतु काही धोकादायक स्टंट असतात जे त्यांच्या डुप्लिकेटद्वारे करून घेऊन चित्रित केले जातात. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील पाच स्टार्सविषयी सांगणार आहोत जे चित्रपटांमधील त्यांच्या धोकादायक स्टंटसाठी डुप्लिकेटचा वापर करतात.

ह्रतिक रोशन :- बॉलिवूडचा सुपरहिरो मानला जाणारा हृतिक रोशन त्याच्या चित्रपटांत स्वत: चे स्टंट स्वत: करतो. परंतु काही वेळेस धोकादायक स्टंट असतात ते त्याच्या प्रशिक्षित डुप्लिकेटद्वारे करून घेतले जातात. ह्रतिक सारखी देहयष्टी असलेला आमिर खान नावाच्या स्टंटमनने बँग-बँग चित्रपटात अनेक धोकादायक स्टंट चित्रित केले होते.अक्षय कुमार :- अक्षय कुमार हा बॉलीवूड इंडस्ट्रीचा सर्वात मेहनती अभिनेता मानला जातो. शक्यतो अक्षय कुमार त्याच्या सर्व चित्रपटात सर्व स्टंट स्वतः करतो. पण काही मोजक्या धोकादायक स्टंट साठी स्टंटमन चा वापर केला गेला. अक्षय कुमारच्या चांदनी चौक टू चायना या चित्रपटामध्ये त्याच्या डूब्लिकेटने खतरनाक स्टंट चित्रित केले होते.अमीर खान :- धूम चित्रपटाचे ३ ही भाग हे त्यात दाखवण्यात आलेल्या जीवघेण्या स्टंट मुळे अधिक चर्चेत आले होते. 2013 मध्ये आलेल्या धूम 3 या चित्रपटात तुम्ही बरेच धोकादायक अ‍ॅक्शन स्टंट्स पाहिले असतील. ते धोकादायक स्टंट स्वत: आमिर खानने केले नसून डूब्लिकेटने केले होते. एका दृष्यात आमिर खान ट्रकच्या खालून दुचाकी बाहेर काढतो. हा सीन आमिर खानवर नव्हे तर त्याच्या डुप्लिकेटवर चित्रीत करण्यात आला होता.शाहरुख खान :- बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला मानले जाते. मात्र स्टंट च्या बाबतीत शाहरुख जरा चोखंदळ आहे. चित्रपटात तो असेच स्टंट करतो ज्यासाठी तो पात्र आहे. चेन्नई एक्स्प्रेस, फॅन यांसारख्या चित्रपटात दाखवले गेलेले स्टंट हे शाहरुखच्या स्टंट प्रशिक्षत डूब्लिकेटने केले होते.सलमान खान :- बॉलिवुडचा भाईजान म्हणजेच मेगास्टार सलमान खानसुद्धा आपल्या चित्रपटातील धोकादायक स्टंटसाठी आपल्या शरीर यष्टी सारख्या दिसणाऱ्या स्टंटमनचा वापर करतो. मात्र काहीवेळेस त्याला जमू शकतील असे स्टंट सलमान खान स्वत: देखील चित्रित करतो. टायगर जिंदा है चित्रपटातील काही दृष्य सलमान सारख्या दिसणाऱ्या हमशकल द्वारे चित्रित केले होते. परंतु, चित्रपट पाहून कोणीही ओळखू शकले नाही.