टीव्ही अभिनेता करण मेहराने मिडिया समोर येऊन पत्नी निशा रावलच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरबद्दल सांगितले. अभिनेत्याने खुलेआम आरोप लावताना म्हंटले आहे कि निशाचे अफेयर तिच्या मानलेल्या भावासोबत होते. सध्या निशा रावलने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. टीव्ही पासून बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांच्यावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरचा आरोप लागला आहे. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत.
मलायका अरोरा: या लिस्टमध्ये मलायका अरोराचे नाव सर्वात पहिला येते. माहितीनुसार अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटाचे कारण अर्जुन कपूरसोबत वाढती जवळीक होते. असे म्हंटले जाते कि मलायका आणि अर्जुनच्या अफेयरच्या चर्चांमुळे दोघांचा घटस्फोट झाला.
दीपिका कक्कड़: टीव्ही जगतामधील प्रसिद्ध चेहरा दीपिका कक्कड़वर देखील एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरचा आरोप लागला आहे. वास्तविक २०११ मध्ये दीपिकाची भेट शोएब इब्राहिमसोबत झाली होती. २०१२ मध्ये अभिनेत्रीने तिचा पती रौनकसोबत घटस्फोट घेतला होता.
पूनम ढिल्लों: बॉलीवूड अभिनेत्री पूनम ढिल्लोंने एका मुलाखती दरम्यान म्हंटले होते कि तिने पतीला धडा शिकवण्यासाठी एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर केले होते. अभिनेत्रीने मुलाखतीमध्ये सांगितले कि तिच्या पतीचे अफेयर होते. अशामध्ये पतीला धडा शिकवण्यासाठी अभिनेत्रीने देखील एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरचा मार्ग निवडला.
काम्या पंजाबी: काम्या पंजाबीच्या पतीने तिच्यावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरचा आरोप लावला होता. घटस्फोटानंतर काम्याचा एक्स पती बंटी नेगीने तिच्यावर आरोप लावला होता कि अभिनेत्रीचे अफेयर संजय दत्तचा कजन निमाई बाली सोबत आहे. अभिनेत्री एक्स पतीने लावलेले आरोप खोटे असल्याचे सांगत म्हणाली होती कि ती घटस्फोटानंतर निमाई बालीसोबत रिलेशनशिपमध्ये आली होती.
संजीदा शेख: टीव्ही अभिनेत्री संजीदा शेखवर देखील एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरचा आरोप लागला आहे. माहितीनुसार आमिर अलीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्रीवर आरोप लागला होता कि दोघांचा घटस्फोट अभिनेत्रीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरमुळे झाला आहे. असे म्हंटले जाते कि अभिनेत्रीचे हर्षवर्धन राणेसोबत अफेयर होते. माहितीनुसार तैशच्या शुटींगदरम्यान संजीदा आणि हर्षवर्धनमध्ये जवळीक वाढली होती.