साउथ आणि बॉलीवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानीला तर आपण सर्वजण ओळखतच असाल, जिने एक बालकलाकार म्हणून आपले करियर सुरु केले होते. हंसिका मोटवानीने कोई मिल गया चित्रपटामध्ये हृतिक रोशनच्या मित्राची भूमिका साकारली होती. त्यावेळी ती खूपच लहान होती. या चित्रपटामधून हंसिका मोटवानी खूपच प्रसिद्ध झाली होती.

यानंतर २००७ मध्ये ती आपका सुरूर चित्रपटामध्ये पाहायला मिळाली. त्यावेळी तिला पाहून सर्वजण हैराण झाले. हंसिका मोटवानी ४ वर्षातच इतकी बदलली होती ती खूपच मोठी दिसू लागली होती. मिडिया रिपोर्टनुसार हंसिका मोटवानीने हार्मोनल इंजेक्शनची मदत घेतली होती. यामुळे ती खूपच लवकर तरुण दिसू लागली होती.हंसिका जेव्हा १४ वर्षांची होती तेव्हापासून ती रिलेशनशिपमध्ये आहे. ती बऱ्याच काळापासून सिलम्बरासनला डेट करत आहे. सिलम्बरासन एक अभिनेता, डायरेक्टर आणि लेखक आहे. हंसिका मोटवानी लवकरच २९ वर्षांची होईल.
हंसिका मोटवानीने बॉलीवूडशिवाय साउथ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. याशिवाय ती टीव्ही सिरियल्समध्ये सुद्धा पाहायला मिळाली होती. हंसिका मोटवानीने शाका लाका बूम बूम, देश में निकला होगा चांद, क्योंकि सास भी कभी बहू थी सारख्या सिरियल्समध्ये काम केले आणि खूपच लोकप्रियता मिळवली.