चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्यामुळे आपल्याच हिरोला चापट मारल्या आहेत या अभिनेत्रींनी !

2 Min Read

बॉलीवूडमध्ये कास्टिंग काउचच्या बातम्या नेहमी समोर येत असतात. परंतु याशिवायदेखील बऱ्याच वेळा अभिनेत्रींना वाईट वागणुकीचा सामना करावा लागतो. पण आजच्या काळामध्ये अभिनेत्री अशा वागणुकीला योग्य उत्तर देत असतात. आज आपण अशाच बॉलीवूडच्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी त्यांच्यासोबत केल्या गेलेल्या चुकीच्या वागणुकीला थप्पड मारून उत्तर दिले होते. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया!

गीतिका :- बॉलीवूडमधील नवीन अभिनेत्री गीतिका त्यागीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गीतिकाने बॉलीवूड निर्माता सुभाष कपूरला थप्पड मारली होती. सुभाष आणि गीतिका एका कार्यक्रमामध्ये पोहोचले होते आणि यादरम्यान सुभाषने गीतिकाला जबरदस्ती स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, ज्यानंतर गीतिकाने विरोध करत रागाच्या भरात थप्पड मारली होती. तथापि नंतर दोघांमध्ये मनधरणी झाली आणि गीतीकाने माफी मागितली.राधिका आपटे :- राधिका आपटे आपल्या बोल्ड सीनसाठी बॉलीवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहे. एका चित्रपटाच्या शुटींगदरम्यान तिने आपल्या हिरोलाच थप्पड मारली होती. साउथच्या एका अभिनेत्याने शुटींगदरम्यान तिच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते तिला योग्य वाटले नाही. ज्यानंतर राधिकाने त्याला थप्पड मारली होती.स्कारलेट विल्सन :- ब्रिटिश मॉडल आणि अ‍ॅक्ट्रेस स्कारलेट विल्सन “बाहुबली: द बिगनिंग” या चित्रपटामधील मनोहरि या आयटम साँगमध्ये पाहायला मिळाली होती. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आपल्यासोबत केलेल्या गैर-वर्तनामुळे तिने आपल्या को-अ‍ॅक्‍टरला थप्पड मारली होती. तिने सांगितले कि, तो अ‍ॅक्‍टर तिला अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता आणि ज्यामुळे तिला राग आला होता आणि स्कारलेटने त्याला जोरात थप्पड मारली होती.रवीना टंडन :- रवीना टंडन ९० दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या काळामध्ये तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सध्या ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूरच असते. गेल्या वर्षी बनवलेल्या चित्रपटाच्या दरम्यान रविना टंडनने आपल्या को-अ‍ॅक्‍टरला एक वेळा नव्हे तर तीन वेळा थप्पड मारली होती. परंतु नंतर समजले कि तो एक शुटींगचाच भाग होता, ज्याला तीन वेळा पूर्ण केले गेले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *