कोणाच कुठे प्रेम जमेल हे सांगता येत नाही. बॉलीवूड मध्ये देखील अशा अनेक प्रेम कहाण्या प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत ज्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शकाच्या प्रेमात पडल्या.

१) उदिता गोस्वामी – जेव्हा उदिता गोस्वामी पाप या चित्रपटाचे शुटींग करत होती तेव्हा तिची ओळख त्या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरी सोबत झाली. त्यानंतर काही काळानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. खूप वेळ एकमेकांना डेट केल्यानंतर उदिता व मोहितने २९ जानेवारी २०१३ मध्ये लग्न केले.
२) राणी मुखर्जी – सगळ्यांना माहितीच असेल कि राणी मुखर्जीने दिग्दर्शक आदित्य चोप्रा सोबत लग्न केले. २१ एप्रिल २०१४ मध्ये राणी व आदित्यने इटली मध्ये लग्न केले. चित्रपटांच्या शुटींग दरम्यानच राणी आदित्यच्या प्रेमात पडली होती. आदित्य चोप्राचे हे दुसरे लग्न होते. २००९ मध्ये आदित्यने त्याच्या पहिल्या पत्नीस घटस्पोट दिला होता. राणी मुखर्जीचा नुकताच मर्दानी २ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यातील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले.
४) कल्की कोचयीन – कल्की कोचयीन ही बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. २००८ साली जेव्हा कल्की देव डी या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होती तेव्हा ती दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली. २०११ मध्ये कल्की व अनुरागने एकमेकांसोबत लग्न केले. परंतु काही कारणास्तव दोघांचे लग्न टिकू शकले नाही व २०१५ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कल्किने दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केले असून ती आता गर्भवती आहे.
४) बिंदिया गोस्वामी – अभिनेत्री बिंदिया गोस्वामी गुलाम चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक जे.पी.दत्तच्या प्रेमात पडली. बिंदिया गोस्वामी व जे.पी.दत्त खूप वर्षे एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिले. आणि त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
५) राम्या कृष्णन – साउथकडील चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री राम्या कृष्णनची ओळख चंद्रलेखा चित्रपटाच्या सेट वर दिग्दर्शक कृष्णा वाम्सीसोबत झाली . पहिल्या मुलाखती नंतर या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री निर्माण झाली. त्यानंतर हळू हळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ११ जून २०११ मध्ये हैदराबाद येथील एका मंदिरात राम्या व कृष्णा वाम्सी यांनी लग्न केले.