आशिकी २ आणि मलंग सारख्या सफल चित्रपटांमध्ये मोहित सुरी सोबत काम केल्यानंतर आदित्य रॉय कपूर तिसऱ्या चित्रपटामधून त्याच्यापासून वेगळा झाला आहे. हा चित्रपट आहे श्रद्धा कपूर सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख अभिनित एक विलेनचा सीक्वल एक विलेन २. एक विलेन २ मध्ये आदित्य रॉय कपूरसोबत जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि दिशा पटानी देखील पाहायला मिळणार आहेत पण यादरम्यान आदित्यच्या चित्रपटाला निरोप देण्याची चर्चा खूपच होऊ लागली आहे. अभिनेता सुरुवातीला तर या चित्रपटाबद्दल खूपच उत्सुक होता पण अचानक त्याने हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला आहे.अभिनेत्याने चित्रपट का सोडला याचे खरे कारण अजून समोर आलेले नाही पण एका इंटरटेनमेंट वेबसाईटनुसार आदित्य रॉय कपूर सुरुवातीला तर या चित्रपटातील भूमिकेमुळे खूपच खुश होता. चित्रपटामध्ये त्याला करण्यासारखे खूप काही होते पण हळू हळू त्याला वाटू लागले कि चित्रपटामध्ये त्याची भूमिका खूपच कमजोर आहे. ज्यानंतर त्याने चित्रपटामध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला. मोहित सुरीने मलंगनंतरच चित्रपटाच्या स्टारकास्टची घोषणा केली होती. अशामध्ये अचानक आदित्य रॉय कपूरच्या चित्रपटाला सोडण्याने प्रोजेक्ट अडकून पडण्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे.
याआधी आदित्य मोहित सुरीच्या आशिकी २ आणि मलंग या दोन चित्रपटांमध्ये पाहायला मिळाला आहे. मलंगमध्ये जिथे आदित्य सोबत दिशा पटानी आणि अनिल कपूर मुख्य भुमिकेमध्ये होते तर आशिकी २ मध्ये श्रद्धा कपूर सोबत त्याची जोडी खूपच पसंत करण्यात आली. तथापि आता पाहावे लागेल कि एक विलेन २ मध्ये आदित्यला कोण रिप्लेस करतो.
आदित्य लवकरच आलिया भट्ट आणि संजय दत्तसोबत महेश भट्टच्या सडक २ चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. ज्याचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे आणि यावर सध्या खूप वाद होत आहेत. चित्रपटाच्या पोस्टरमुळे आलिया भट्ट आणि महेश भट्ट खूपच ट्रोल होत आहेत.