काळे कपडे घालणं किंवा काळया रंगाच्या वस्तू वापरणे अशुभ मानले जाते. पण जेव्हा वाईट नजर किंवा नकारात्मक शक्तींपासून वाचायचे असेल तर मात्र काळया धाग्यांचा वापर केला जातो. बरेच लोक काळया रंगाचा धागा पायात, हातात, गळयात घालताना पाहिले असेल पण तो धागा नक्की का बांधतात याचे खरे कारण जास्त कोणाला माहित नसते. काही जण तर फक्त फॅशन म्हणून पण काळया रंगाचा धागा घालतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की काळया रंगाचा धागा का बांधतात, तो धागा कुठे बांधावा व त्यामागील वैज्ञानिक कारण काय आहे.

आपले शरीर हे पंच तत्त्वानी मिळून बनलेले असतें. ही पंच तत्वे म्हणजे पृथ्वी, वायू, अग्नी, जल, आणि आकाश. यांपासून मिळणारी ऊर्जा आपल्या शरीराला उपयोगात येते. जेव्हा कोणाची वाईट नजर आपल्याला लागते तेव्हा तेव्हा या पंच तत्वांपासून मिळणारी संबधित सकारात्मक ऊर्जा ही त्या नकारात्मक उर्जेस आपल्यापर्यंत पोहचू देत नाही म्हणून काळया रंगाचा धागा पायात बांधतात. काळी वेळेस लोक या काळया रंगाच्या धाग्यात देवाच्या फोटोंचे लॉकेट घालतात हे शुभ मानले जाते. वाईट नजरेपासून वाचण्यासाठी या रंगाचा धागा बांधला जातो. बाळाला देखील काळया रंगाचा टिक्का लावला जातो या परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.

काळया रंगाच्या धाग्या मुळे नजर लावणाऱ्या व्यक्तीची एकाग्रता भंग पावते यामुळे नकारात्मक ऊर्जा समोरील व्यक्तीला प्रभावित करू शकत नाही. काही वेळा एखाद्या व्यक्ती च्या पोटात जोरात दुखू लागते, असह्य वेदना होऊ लागतात अशावेळी दोन्ही पायाच्या अंगठ्याला काळा धागा बांधल्यास पोटदुखी कमी होते. अनेकदा मोठी माणसे डाव्या पायात काळा धागा बांधण्यास सांगतात त्यामुळे तुमच्या पायाचे दुखणे कमी होते. जर दिवसभरात उभ्याने काम करत असाल तर पाय दुखणे स्वाभाविक आहे. त्यामुळे जर तुम्ही पायात काळा धागा बांधण्यास सुरुवात केली तर तुमची पाय दुखी ची समस्या नक्कीच दूर होईल. शास्त्रात सांगितल्यानुसार जर तुम्ही तुमच्या उजव्या पायात मंगळवारी काळा धागा बांधल्यास तुमच्या घरात धनलाभ होतो. तुमच्या जीवनातील पैशां संबंधीची समस्या दूर होते, तसेच शनी दोषापासून वाचण्यासाठी देखील काळा धागा वापरावा.