लग्नाच्या ९ महिन्यानंतर विक्की कौशलने व्यक्त केले दु:ख, सांगितले यावरून होते दोघांमध्ये भांडण…

3 Min Read

विक्की कौशल आणि कॅटरिना कैफ बॉलीवूडमधील हॉट कपल्स पैकी एक आहे, दोघांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न केले होते. तेव्हापासून आता पर्यंत त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर चाहते नजर ठेऊन आहेत. प्रत्येकजण हाच विचार करत आहे कि कॅटरिना कैफ सारखी एक मॉडर्न महिला विक्कीसारख्या सिम्पल व्यक्तीसोबत लग्नानंतर कसे दिवस घालवत आहे.

अजूनपर्यंत विक्की आणि कॅटरिनाच्या वैवाहिक लाईफ संबंधी कोणतीच आतली बातमी आली नव्हती. आता स्वतः विक्कीने आपल्या वैवाहिक लाईफसंबंधी अनेक गुपिते उघड केली आहेत. तिने खुलेआम सांगितले कि त्यांचे आणि कॅटरिनाचे नेहमी एका गोष्टीवरून भांड होत असते. याचा खुलासा विक्कीने प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जौहरच्या कॉफी विथ करण या प्रसिद्ध शोमध्ये केला आहे.

करण जौहरचा कॉफी विथ करण एक लोकप्रिय चॅट शो आहे. यामध्ये अनेक बॉलीवूड कलाकार येत असतात आणि आपल्या पर्सनल लाईफसंबंधी खुलासे करत असतात. सध्या या शोच्या ७वा सीजन सुरु आहे. याच्या नवीन एपिसोडमध्ये विक्की कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकत्र आले आहेत. यावेळी करणने विक्की कौशलला त्याच्या वैवाहिक लाईफसंबंधी अनेक प्रश्न विचारले.

कॉफी विथ करण मध्ये करणने विक्की कौशलला विचारले कि असे कोणते कारण आहे ज्यामुळे तुझे आणि कॅटरिनाचे भांडण होते. यावर विक्की लगेच म्हणाला कि क्लोेजेट स्पेेस. तो यावर विस्ताराने सांगतो कि हे कमी होत चालले आहे. अर्ध्यापेक्षा जात खोलीवर कॅटरिनाने कब्जा केला आहे. मला फक्त एक कपबोर्ड मिळाला आहे पण लवकरच ते एक ड्रॉवर बनेल.

विक्की कौशलचे म्हणणे ऐकल्यानंतर करण देखील सहमत होतो. तो म्हणतो कि मी विक्की आणि कॅटरिनाच्या घरी गेलो आहे. त्यांच्याजवळ खरच एकच क्लोतजेट स्पेकस आहे. याशिवाय करणने विक्कीला कॅटरिनाच्या सर्वात बेकार चित्रपटाबद्दल विचारले तेव्हा विक्की म्हणाला कि फितूर चित्रपट कॅटरिनाचा सर्वात बेकार चित्रपट आहे.

रॅपिड फायर राऊंडमध्ये विक्कीने कॅटरिनाचे खूपच कौतुक केले. त्याने म्हंटले कि कॅटरिना एक चांगली कुक आहे. विक्कीसोबत लग्न केल्यानंतर कॅटरिना पूर्णपणे देसी रंगामध्ये बुडाली आहे. ती आधीपेक्षा जास्त भारतीय झाली आहे. ती पती आणि सासू-सासऱ्यांची काळजी देखील घेते. लग्नानंतर ती नेहमी भारतीय पेहरावात दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर कॅटरिना लवकरच तिचा जुना बॉयफ्रेंड सलमान खानसोबत टायगर ३ मध्ये दिसणार आहे. याशिवाय कॅटरिना फोन भूतमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि इमरान हाशमीसोबत मुख्य भूमिका करणार आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. तर पती विक्की कौशल सॅम बहादुर, गोविंदा नाम मेरा आणि द इमोर्टल अस्वथामा सारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *