बॉलीवूड अभिनेता ऋतिक आणि ऐश्वर्या रायचा सुपरहिट चित्रपट जोधा अकबर लोकांना खूपच पसंत आला होता, त्याचबरोबर या चित्रपटामधील ऐश्वर्या रायचा लुक आणि ज्वेलरीसुद्धा लोकांना खूपच पसंत आली होती. चित्रपटामध्ये लेहंग्यापासून ते ज्वेलरीपर्यत याची झलक साफ दिसत होती, ज्यामुळे मार्केटमध्ये याची डिमांड खूप जास्त होती. यामध्ये खऱ्या सोन्यापासून आर्टिफिशल ज्वेलरीपर्यंत सर्व पर्याय होते. पण तुम्हाला माहिती आहे का कि जोधा अकबरमध्ये ऐश्वर्याने जे दागिने वापरले होते त्यामधील एकसुद्धा दागिना खोटा नव्हता? हे सर्व दागिने खऱ्या सोन्याचे आणि किंमती स्टोन्सपासून बनवले गेले होते. चला तर जाणून घेऊया या दागिन्यांमागील स्टोरी.ऐश्वर्या रायच्या जोधाच्या लुकसाठी तनिष्कने एक टीम बनवली होती, ज्यांनी योग्य लूकच्या ज्वेलरीसाठी इतिहासाचा अभ्यास केला. यासाठी त्यांना खूपच प्रवास करावा लागला आणि मुघल काळातील राजपूत आणि मुघल परिवारातील अनेक पेंटिंग्जपासून नोट्स घ्याव्या लागल्या. सर्वात चॅलेंजिंग पार्ट हा होता कि जोधाबाई संबंधित अधिक माहिती कोठेही उपलब्ध नव्हती, अशामध्ये टीमने दुसऱ्या राजघराण्यांच्या पेंटिंग्ज आणि माहिती वरून दागिन्यांची हिंट्स घेतली.
ऐश्वर्यासाठी जे दागिने तयार करण्यात आले होते त्यांचे वजन जवळ जवळ ४०० किलो होते. हे बनवण्यासाठी खरे सोने आणि स्टोन्स वापरण्यात आले होते. कंपनीकडून असे सांगण्यात आले कि सर्व दागिन्यांमध्ये जवळ जवळ २०० किलो सोने, वेगवेगळे किंमती स्टोन्स, मोती इत्यादी वापरण्यात आले होते. ऐश्वर्याने चित्रपटामध्ये लग्नाच्या सीनमध्ये जे दागिने घातले होते, त्याचेच वजन जवळ जवळ साडे तीन किलो पेक्षा जास्त होते. या दागिन्यांपासून शुटींग करण्यासाठी २०० कारागिरांनी दिवस-रात्र काम केले होते. हे दागिने इतिहासानुसार बनवायचे होते म्हणून ते हाताने बनवण्यात आले होते, यामुळे ते बनवण्यासाठी खूपच वेळ लागला होता.
सतत काम करून देखील ४०० किलो दागिन्यांना त्यांचे रूप देण्यासाठी जवळ जवळ दोन वर्षांचा कालावधी लागला, ज्यानंतर चित्रपटामध्ये ते वापरण्यात आले. चित्रपटामध्ये भारी कपडे आणि दागिने परिधान केल्यानंतर ऐश्वर्या एखाद्या राणीसारखीच दिसत होती. तथापि पडद्यावर ती जितकी सहज दिसत होती तितकेच तिला रियलमध्ये खूपच त्रास होत होता. तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि चित्रपटासाठी तयार होण्यासाठी सर्वात मोठे चॅलेंज ज्वेलरी परिधान करणे होते. ऐश्वर्याने याच गोष्टीवर हैराणी जाहीर केली होती कि त्या काळातील राजघराण्यातील स्त्रिया इतके भारी दागिने दिवसभर कसे घालत असतील.