जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक राहिलेली अभिनेत्री ऐश्वर्या रायचे सौंदर्य आज देखील जसेच्या तसे आहे. आज देखील तिच्या डोळ्याचा रंग आणि चेहऱ्यावरील तेज लोकांना घायाळ करते. सोशल मिडियावर ऐश्वर्या रायचे जुने फोटो आणि व्हिडीओ नेहमी व्हायरल होत राहतात.

यादरम्यान नुकतेच तिच्या पासपोर्टचा एक फोटो खूप व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये असलेली एक माहिती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे आणि प्रत्येकजण सध्या त्यावर बोलत आहे. ऐश्वर्याच्या पासपोर्टवर जी माहिती लोकांना हैराण करत आहे आहे ती आहे तिचा फोटो.

कोणतेही सरकारी ओळखपत्र मग ते आधार कार्ड असो किंवा पासपोर्ट, त्यावर लोकांचे फोटो बिलकुल देखील चांगले येत नाहीत. पण ऐश्वर्याच्या पासपोर्टवर तिचा फोटो पाहून लोकांचे होश उडाले आहेत. ती पासपोर्टवर तितकीच सुंदर दिसत आहे जितकी रियल लाईफमध्ये आहे. हा फोटो पाहून लोकांना विश्वास बसत नाही आहे आणि लोक यावर भरभरून कमेंट करत आहेत.

एका युजरने ऐश्वर्याचा फोटो पाहून लिहिले आहे कि जगामध्ये हा एकमेव असा पासपोर्ट आहे ज्यावर इतका सुंदर फोटो आहे. हेच कारण आहे कि या पासपोर्टच्या फोटोला व्हायरल होण्यास वेळ लागला नाही. आई झाल्यानंतर ऐश्वर्या राय चित्रपटामध्ये खूपच कमी सक्रीय आहे आणि सध्या ती आपल्या कुटुंब आणि मुलगी आराध्यावर लक्ष देत आहे.

पण काही मोजक्याच प्रोजेक्ट्ससाठी ती वेळ काढते. नुकतेच ती मणिरत्नमच्या पोन्नियिन सेलवन चित्रपटामध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिचा डबल रोल होता आणि तिला खूपच पसंद केले गेले. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जबरदस्त हिट झाला नि या चित्रपटाने ५०० करोडचा आकडा पार केला.