बॉलीवूडमध्ये असे अनेक अभिनेता आहेत जे एकाच वेळी जास्त अभिनेत्रींसोबत संबंध बनवले आहेत. अशाच अभिनेत्यांमध्ये अजय देवगनचे नाव देखील घेतले जाते. बॉलीवूडमधील सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजय देवगनचे रियल लाईफमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत संबंध राहिले आहेत.

तब्बू: ५१ वर्षाची झालेली तब्बू आजूनपर्यंत अविवाहित आहे. कारण तब्बू अजय देवगनवर प्रेम करत होती. दोघांमध्ये फूल और कांटे चित्रपटाच्या दरम्यान जवळीक वाढली होती. तब्बू आणि अजय देवगनच्या रिलेशनच्या चर्चा त्यावेळी खूप झाल्या होत्या. पण नंतर अजय देवगनने तब्बूला सोडून काजलसोबत लग्न केले.

करिश्मा कपूर: ९० च्या दशकामध्ये करिश्मा कपूर आणि अजय देवगनमध्ये खूप जवळीक होती. दोघांना पाहून असे वाटत होते कि दोघे एकमेकांना डेट करत आहेत. संग्राम आणि जिगर चित्रपटामध्ये एकत्र काम केल्यानंतर दोघे जवळ आले होते. पण करिश्मा कपूर आपले करियर बनवण्यासाठी अजय देवगनपासून दूर जाऊ लागली.

रवीना टंडन: रवीना टंडन आणि अजय देवगन यांचे नाते अजय देवगनच्या लग्नानंतर देखील होते आणि जेव्हा याची माहिती काजलला मिळाली तेव्हा काजलने स्वतः यामध्ये पडून अजय देवगनला रवीना टंडन पासून दूर केले. तथापि हि गोष्ट इतकी पसरली होती कि अजय देवगन काजलला सोडून रवीना टंडनसोबत लग्न करणार असल्याची अफवा देखील उडाली होती.

कंगना रनौत: बॉलीवूडची धाकड गर्ल कंगना रनौतचे नाव देखील अजय देवगनसोबत जोडले गेले होते. दोघांनी वंस अपॉन ए टाइम इन मुंबई चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. ज्यामध्ये दोघांनी खूप बोल्ड सीन दिले होते. यादरम्यान असा अंदाज लावला जात होता कि अजय देवन आणि कंगना रनौत एकमेकांना डेट करत आहेत. यानंतर अभिनेत्याने स्वतः समोर येऊन सांगितले होते कि कंगना फक्त त्याची को-स्टार आहे.