जगातील सर्वात महागड्या कारची किंमत पाहून व्हाल चकीत, बॉलिवूडच्या सिंघमने खरेदी केली ही कार !

2 Min Read

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन, ज्याला सिंघम म्हटले जाते आणि त्याचा ”तान्हाजी” हा चित्रपट सध्या खूप लोकप्रिय होत आहे, दरम्यानच्या काळात अजय देवगनने एक एसयूव्ही कार खरेदी केली आहे. अजय देवगनला कारची खूप आवड आहे आणि त्यांच्याकडे गॅरेजमध्ये एकापेक्षा एक उत्तम कार आहेत, ज्यामध्ये मर्सिडीज बेंज डब्ल्यू ११५ २२०डी, मिनी कूपर, बीएडब्ल्यू जेड ४, रेंज वोग सारख्या महागड्या कार आहेत. काही दिवसांतच अजय देवगनने त्याची पत्नी काजोलला ऑडी ए ७ लक्झरी एसयूव्ही गिफ्ट म्हणून दिली होती.

त्याच्या गॅरेजमध्ये बऱ्याच लग्जरी कार आसूनही अजयने जगातील सर्वात सूंदर आणि महागडी एसयूव्ही रॉल्स रॉयस क्लीनिन विकत घेतली आहे. अजयने ही कार खूप दिवसापासून आडॅर केली होती, परंतू कारला कस्टमाइज करण्यासाठी बराच वेळ लागला, पण आता ही कार त्याच्या जवळ आली आहे.रोल्स रॉयस क्लीनिन जगातील सर्वात महागड्या एसयूव्हींपैकी एक आहे, जिचे सुरवातीचे मॉडल ६.९५ कोटी रूपयांपासून सुरू होते. तथापि, ही कार कस्टमाइज केल्याने त्याची किंमत आणखीणच वाढते. अजयने या कारमध्ये काय कस्टमाइज केले, हे अद्यापही समोर आलेले नाही. ही कार भारतातील काही नामांकित लोकांकडेच आहे, ज्यामध्ये देशाचे सर्वात मोठे उदयोगपती मुकेश अंबानीचे नाव देखील सामील आहे. याशिवाय टी-सीरीज़चे मालक भूषण कुमार यांनीही लाल रंगाची एसयूव्ही बूक केली होती.अजय देवगनला अजूनही गाडीच्या आत बसलेला किंवा ड्रायव्हिंग करताना पाहिले गेले नाही, ही कार खरेदी करण्याबाबत अजय देवगण कडून अजूनही कोणतेही वक्तव्य आलेले नाही. परंतू एका व्यक्तीने पार्किंगमध्ये पार्क केलेल्या कारचा फोटो क्लिक केला ज्यानंतर ऑनलाइन माहिती काढल्यानंतर अजय देवगन कारचा मालक असल्याचे आढळूण आले.या महागड्या आणि शानदार एसयूव्ही रोल्स रॉय क्लिनिनमध्ये ६.८ लीटरचे ट्विन चार्जर व्ही १२ पेट्रोल इंजिन जोडलेले आहे जे ५६० बीएचपी आणि ८५० एनएम टॉर्क देते. कारच्या आत ८-स्पीड ऑटोमैटिक गियरबॉक्स आहे. कार फक्त ० ते १०० किमी पर्यंत अंतर ५ सेकंदात कापू शकते. कारची टॉप स्पीड २४९ किलोमीटर प्रति तास आहे. कारमध्ये सस्पेंशन सोबत ३६० डिग्री कॅमेरा सिस्टम देखील आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *