सध्या अक्षय कुमार आपल्या सूर्यवंशी या चित्रपटासाठी खूपच चर्चेमध्ये आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत अजय देवगन, रणवीर सिंह, जॅकी श्रॉफ, कॅटरीना कैफ मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता ज्याला दर्शकांनी देखील खूपच पसंती दिली. पण आज आपण या लेखामधून अक्षय कुमारच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत.

जर अक्षय कडून हि चूक झाली नसती तर ट्विंकलच्या जागी हि अभिनेत्री असती त्याची पत्नी :- तुम्हाला माहितीच असेल कि २००७ मध्ये अक्षय कुमारचे ट्विंकल खन्नासोबत लग्न झाले होते. हे दोघे बऱ्याच काळापासून एकमेकांना पसंत करत होते. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची पहिली भेट फिल्मफेयर मॅगजीनच्या फोटोशूटच्या दरम्यान मुंबईमध्ये झाली होती. त्यादरम्यान दोघे एकमेकांना पसंत करू लागले होते. तसे आजसुद्धा या दोघांमध्ये खूप प्रेम आहे. यांच्या लग्नाला १९ वर्षे उलटली आहेत.पण अक्षय कुमारच्या करियरच्या सुरवातीचा काळ त्याच्या अफेयरच्या चर्चेमुळे देखील खूप गाजला. अक्षय कुमारचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आणि आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जी ट्विंकल खन्नाच्या जागी अक्षय कुमारची पत्नी असू शकली असती. वास्तविक त्या अभिनेत्रीचे नाव रविना टंडन आहे. रविना टंडन आणि अक्षय कुमार मोहरा चित्रपटाच्या शुटींगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते आणि अक्षय कुमारसाठी रविना टंडन आपले करियर देखील सोडायला तयार होती.झाली होती एंगेजमेंट :- असेही म्हंटले जाते कि रविना टंडन आणि अक्षय कुमार यांनी एका मंदिरामध्ये एंगेजमेंट देखील केली होती आणि दोघांच्या लग्नाची बातमी काही क्षणात सर्वत्र पसरली होती पण खिलाड़ियों का खिलाड़ी या चित्रपटाच्या वेळी दोघांच्या नात्यामध्ये मतभेद निर्माण झाले कारण चित्रपटानंतर अक्षय कुमार आणि रेखा यांच्यामध्ये जवळीक वाढली होती. सूत्रांनुसार रविना टंडनने अक्षय कुमारला एका पार्टीदरम्यान रेखासोबत पाहिले होते आणि यानंतर रविना टंडनने अक्षय कुमारपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.