बॉलीवूड आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये अभिनेत्री नीतू चंद्राने अभिनयाच्या जोरावर खूप नाव कमवले आहे. अभिनयासोबत नीतू चंद्रा आपल्या बेधडक वक्तव्यामुळे देखील ओळखली जाते. २००५ मध्ये तिने अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांच्या गरम मसाला चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. याशिवाय नीतू चंद्रा अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. आता अभिनेत्रीने एक मोठा धक्कादायक खुलासा केला आहे. एका व्यावसायिकाने तिला २५ लाख रुपये पगारावर बायको बनण्याची ऑफर दिली होती. नीतू चंद्राने सांगितले कि यासाठी तिला दर महिन्याला २५ लाख रुपये पगार मिळणार होता.

नीतू चंद्रा म्हणाली कि माझी स्टोरी एक सफल अभिनेत्री नाही तर एक असफल स्टोरी आहे. आज माझ्याजवळ कोणतेही काम नाही. मला सांगितले गेले कि एका मोठ्या व्यावसायिकाची बायको बनावे लागेल. यासाठी मला २५ लाख रुपये दर महिन्याला पगार मिळेल. माझ्याजवळ पैसे नव्हते ना काम नव्हते.

नीतू चंद्रा पुढे म्हणाली कि एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहे पण मी त्याचे नाव घेणार नाही. ऑडिशनच्या वेळी एका तासामध्ये त्याने म्हंटले कि मला माफ कर हे होणार नाही. तुम्ही माझे ऑडिशन घेतले कारण मला रिजेक्ट केले. ज्याद्वारे माझे कॉन्फिडेंस तोडू शकाल. नीतू चंद्राने नेव्हर बॅक डाउन: रिव्हॉल्ट चित्रपटामधून हॉलीवुड डेब्यू केले.

आपल्या हॉलीवुड प्रोजेक्टबद्दल अभिनेत्रीने सांगितले कि मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे कि लोक अजून देखील हि गोष्ट पचवू शकत नाही आहेत. त्यांना वाटत आहे कि मी आपल्या बळावर हॉलीवुडमध्ये काम करत आहे. एक मुलगी आणि कोणत्याही बॅकअप किंवा पार्श्वभूमीशिवाय मी तिकडे जाऊन मुख्य भूमिका करत आहे. अशामध्ये लोक खूपच शॉक आहे.

नीतू चंद्राने चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची सुरुवात २००५ मध्ये अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमच्या गरम मसाला चित्रपटामधून केले होते. याशिवाय ती ट्रॅफिक सिग्नल, १३बी, ओये लकी! लकी ओये चित्रपटामध्ये देखील दिसली होती. याशिवाय नीतू चंद्राचे आपले प्रोडक्शन हाउस चंपारण टॉकीज देखील आहे, ज्याद्वारे तिने देसवा आणि मिथिला मखान सारखे चित्रपट बनवले आहेत.