आजकाल सर्वसामान्यांपासून ते वी आय पी लोकांपर्यंत सर्वच लोकं हेल्थ कॉन्शस झाली आहेत. काही लोकांचा अपवाद सोडल्यास बरेच जण विशेषतः तरुणाई आपल्या आरोग्याबाबत आणि फिटनेस बद्दल खूप जागरूक आहे. ह्या इंटरनेट च्या जमान्यात भरपूर माहिती मोफत उपलब्ध असल्याने स्वतः माहिती गोळा करून त्याप्रमाणे आपला आहार आणि व्यायाम निवडतात. कमी बजेट मध्ये पौष्टिक आहार त्यांना मिळतो. त्यामध्ये दूध, अंडी, शेंगदाणे, चणे, व्हे प्रोटीन ह्यांचा समावेश ते आपल्या आहारात करतात. ह्या मध्ये बॉलीवूड स्टार्स ही कमी नाहीत.

बॉलीवूड स्टार्स कडे पैशांची कोणतीही कमी नाहीये. हे स्टार्स आपले कपडे आणि लग्झरी लाइफस्टाइल मध्ये आपल्या खाण्याचाही समावेश करतात. आपणा सर्वांना माहितीच असेल अक्षय कुमार हेल्थ साठी किती जागरूक आहे. त्याचा दिवस पहाटे ४ वाजता सुरु होतो आणि शेवटचे जेवण संध्याकाळी ७ च्या आत घेतो. रात्री जर भूक लागलीच तर व्हाईट एग चं ऑम्लेट बनवून खातो जे पचण्यासाठी चांगले असते. त्याच्या घरी येणारं दूध ही खूप महाग आहे.तुमच्या घरी येणाऱ्या दुधाची किंमत जरी ४०-५० रुपये प्रति लिटर असली तरी अक्षय कुमार च्या घरी येणाऱ्या दुधाची किंमत १९० रुपये लिटर आहे. दूध गायीचे असते पण त्या गाईंना खाण्यासाठी खास आहार दिला जातो ज्यामुळे ह्या गायी पौष्टिक दूध देतात. ह्या गायींच्या दुधात कॅल्शिअम आणि प्रोटीन चे प्रमाण जास्त असते. कॅल्शिअम हाडांच्या आणि दातांच्या विकासासाठी आवश्यक असते तसेच मसल बिल्डींग मधेही ह्याचा उपयोग होतो. मेंदूने पाठवलेले संदेश शरीरापर्यंत पोचवण्यासाठी कॅल्शिअम आवश्यक असते.

ह्या गाईंना शुद्ध RO चे पाणी प्यायला दिले जाते आणि त्यांची राहण्याची जागा सुद्धा खूप स्वच्छ असते. उन्हाळ्यामध्ये ह्या गाईंसाठी खास AC ची व्यवस्था केली जाते. गायींच्या आरोग्याची चाचणी नियमितपणे केली जाते आणि गाय जर आजारी असेल तर तिचं दूध पाठवलं जात नाही. आपल्याकडे येणाऱ्या पॅकेज्ड दुधामध्ये प्रेजर्वेटिव्हस असतात त्यामुळे दूध लवकर खराब होत नाही.हे दूध केवळ वी आय पी लोकांनाच दिले जाते. इतर नागरिकांसाठी हे दूध उपलब्ध नाही. ह्या दुधामध्ये पौष्टिकता गायींना दिल्या जाणाऱ्या हिरव्या भाज्यांमधूनही मिळते. गायीचं दूध काढण्यासाठी मशीन चा वापर केला जातो आणि काढून झाल्या नंतर २ तासांच्या आतच हे दूध ग्राहकांच्या घरी पोचवले जाते. हे दूध लवकरात लवकर ग्राहकांना पोचवल्या मुळे ह्यात प्रेजर्वेटिव्हस ऍड केले जात नाहीत. हे दूध नैसर्गिक रीत्याच फ्रेश असते.

दर दिवसाला लाखोंची कमाई करणाऱ्या अक्षय कुमार साठी १९० रुपये काहीच किंमत नसली तरी सर्वसामान्यांसाठी ही किंमत न परवडणारीच आहे. अक्षय कुमार कडे येणारं दूध आपण नाही घेतलं तरी १५-२० रुपये अतिरिक्त मोजून आपण चांगल्या कॉलीटी चे दूध नक्कीच घेऊ शकतो. लेख आवडला असेल तर शेयर करा आणि तुम्ही कोणत्या ब्रँड चं दूध वापरता ते ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा. भेसळयुक्त दुधापासून सावधान रहा.