सध्या बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आपल्या लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे आणि यामध्ये अभिनेत्यांचा लुक त्याने साकारलेल्या इतर भूमिकांपेक्षा खूपच वेगळा आहे. खिलाडी कुमार जिथे आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो तिथे त्याची लाईफस्टाईल देखील हटके आहे. अक्षय कुमार जवळ फक्त भारतातच नाही तर विदेशांमध्ये देखील खूप प्रॉपर्टीज आहेत. खूप कमी लोकांना माहिती आहे कि त्याच्याजवळ अनेक सुंदर बंगले आहेत. जिथे तो आपल्या कुटुंबासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करतो. चला तर जाणून घेऊयात अक्षय कुमारच्या आलिशान बंगल्यांबद्दल.

मुंबईमध्ये अक्षय कुमारचे शानदार घर :- अभिनेता अक्षय कुमार आपल्या पत्नी, मुलगा आरव आणि मुलगी नितारासोबत जुहूच्या एका डुप्लेक्स मध्ये राहतो. जो खूपच सुंदर आहे ज्याला पत्नी ट्विंकल खन्नाने आपल्या हातांनी सजवले आहे. बंगल्यातून समुद्राचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. २०१७ मध्ये मुंबई मिररच्या एका रिपोर्टनुसार याशिवाय त्याने मुंबईच्या अंधेरीमध्ये ४ फ्लॅट्स खरेदी केले आहेत. प्रत्येक फ्लॅटची किंमत ४.५ करोड सांगितली जाते.गोवामध्ये अक्षयचे खास घर :- अक्षय कुमारचा एक सुंदर बंगला गोवामध्ये देखील आहे. अक्षयचा गोवामध्ये आपला एक विला आहे. जवळजवळ १० वर्षांपूर्वी अक्षयने हा विला ५ करोडमध्ये खरेदी केला होता. अक्षयचा हा बंगला समुद्राच्या किनारी आहे. इथे अभिनेता आपल्या कुटुंबासोबत नेहमी वेळ घालवत असतो. गोवा जाणून तो प्रसिद्ध शेफला बोलावतो जो त्याच्या कुटुंबासाठी जेवण बनवतो.कॅनडामध्ये अभिनेत्याने खरेदी केला डोंगर :- तुम्हाला सर्वांना माहिती असेल कि अक्षय कुमारला कॅनडाचे नागरिकत्व मिळालेले आहे. एका रिपोर्टनुसार तिथे टोरांटो मध्ये त्याने एक अपार्टमेंट नाही तर पूर्ण डोंगरच खरेदी केला आहे. अक्षय कुमार टोरांटोमध्ये काही पॉश अपार्टमेंट आणि बंगल्यांचा मालक आहे. अक्षय जिथे आपल्या कुटुंबासोबत नेहमी सुट्ट्या घालवण्यासाठी येत असतो. इथे जवळ जवळ तो एक महिना टाईम घालवतो.मॉरीशसमध्ये आहे अभिनेत्याजवळ आलिशान घर :- बीच वर एन्जॉय करताना आरामासाठी अक्षयने मॉरीशसच्या एका प्रसिद्ध बीच वर एक बंगला खरेदी केला आहे. इथे खिलाडी अक्षय आपल्या कुटुंबासोबत खूप मस्ती करताना पाहायला मिळतो.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.