बॉलिवूडचा खिलाडी म्हणजे अक्षय कुमार. गेली दोन दशकांहून अधिक काळ तो जगभरातील लोकांच्या मनावर राज्य करतोय. त्याने त्याच्या अभिनयाच्या आणि फिटनेसच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अक्षय कुमारचे खरं नाव आहे राजीव भाटिया. मात्र बॉलिवूडमध्ये एन्ट्री करताना त्याने त्याचे नाव राजीव भाटियावरून अक्षय कुमार करून घेतले. नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांसाठी अक्षय ओळखला जातो. अक्षयला तर सर्वच ओळखतात त्याची चर्चा ही नेहमी होत असते, मात्र आज आम्ही त्याच्या अगदी जवळच्या एका व्यक्तीविषयी सांगणार आहोत. जिच्याविषयी फारसं कोणाला माहिती नाही. हि व्यक्ति म्हणजे अलका भाटिया. पडला ना तुम्हालाही प्रश्न की कोण ही अलका भाटिया. तर ही अलका भाटिया म्हणजे अक्षय कुमारची बहीण. फारसं कोणाला तिच्याबद्दल माहीत नाही, पण आज आम्ही तुम्हाला तिची माहिती देणार आहोत.अक्षय आणि अलका दोघे बहीण भाऊ अमृतसर मध्ये जन्माला आले. अक्षय कुमारच्या आईचे नाव अरुणा भाटिया, तर वडिल हरिओम भाटिया एक मिलिटरी ऑफिसर होते. त्यामुळे फिटनेस संदर्भातील आवड अक्षयला त्याच्या वडिलांकडे बघून निर्माण झाली. यात काही शंका नाही कि अक्षय कुमार आजच्या घडीला बॉलिवूडमधील सर्वात जास्त फी घेणारा अभिनेता आहे. त्याची प्रॉपर्टी करोडोंमध्ये आहे. त्याचे ऍक्टिंग व्यतिरिक्त अनेक बिझनेस सुद्धा आहेत. आजच्या घडीला सध्या बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत हिरोंपैकी एक अक्षय कुमार ओळखला जातो. एका सिनेमासाठी जवळपास तो 54 करोड रुपये आकारतो. अक्षय बॉलिवूडमधील सर्वात जास्त फी घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. एका मराठी वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्याची ही फी आहे. वर्षभरात साधारणपणे 5 ते 6 सिनेमे करणारा अक्षय या बॉलिवूडचा एकमेव स्टार असेल. कोट्यवधींची संपत्ती असलेला अक्षयचा बिझनेस सुद्धा आहे. हे झालं अक्षयबाबत, आता त्याच्या बहिणीबद्दल जाणून घेवूया.अक्षय करोडोंच्या संपत्तीचा मालक असला तरी त्याची छोटी बहीण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत आहे. ती ना कोणताही बिझनेस करते ना कोणतेही काम. तरीही ती कोट्यवधी कसे कमावते असा प्रश्न तुमच्या आमच्या सारख्या अक्षयच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. २३ डिसेंबर २०१२ मध्ये अक्षयची बहीण अलका भाटिया अचानक लग्नामुळे चर्चेत आली. त्याची बहीण अलका चर्चेत येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तिची संपत्ती. सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याची जेव्हढी चर्चा होते, तेव्हढीच त्यांच्या संपत्तीची देखील होत असते.अक्षयची बहीण अलका चर्चेत येण्यामागे काही महत्वाची कारणे आहेत. या कारणांमध्ये तिचे वय, तिच्यापेक्षा वयाने खूप मोठा असलेला तिचा नवरा, तिचे दुसरे लग्न आणि शेवटचे कारण म्हणजे भारतातल्या टॉप १०० जणांच्या लिस्टमध्ये नाव असलेल्या सुरेंद्र हिरानंदानी यांच्याशी विवाह. वयाच्या ४० व्या वर्षी अलकाने दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. तिने घेतलेला हा निर्णय अक्षयलाही फारसा पटला नव्हता. याचे कारण म्हणजे पहिल्या नवऱ्यापासून तिला एक मुलगी होती आणि दुसरा पती हा तिच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठा तसेच विवाहित होता. अलकाने ज्या व्यक्तीची पती म्हणून निवड केली होती ते सुरेंद्र भारताच्या सर्वात १०० श्रीमंतांच्या यादीत येतात.याची चार मुख्य कारणं होती, एक म्हणजे ती अक्षयची बहीण आहे आणि ती लग्न करत होती. दुसरे कारण म्हणजे ती ४० वर्षाची होती आणि ती तिच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लग्न करत होती. तिसरे कारण म्हणजे अल्का आणि सुरेंद्र हिरानंदानी ज्याच्याशी ती लग्न करत होती ह्या दोघांचेही हे दुसरे लग्न होते. चौथे कारण म्हणजे सुरेंद्र हिरानंदानी ज्याच्याशी अलका भाटिया लग्न करणार होती त्यांचा भारताच्या सर्वात १०० श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश होतो. अक्षय कुमारला जेव्हा माहिती पडले कि त्याची बहीण ४० व्या वर्षी दुसरे लग्न करत आहे, तेव्हा तो ह्या नात्याने जरा सुद्धा खुश नव्हता. कारण अल्काला पहिल्या पतीपासून अगोदरच एक मुलगी होती. अक्षयच्या नाखूश होण्याचे दुसरे कारण हे सुद्धा होते कि त्याच्या बहिणीचा होणारा नवरा तिच्यापेक्षा १५ वर्षांने मोठा होता. इतकंच नाही, तर त्याच्या मुलीचे वय सुद्धा लग्नाच्या वयाचे झाले होते.
सुरेंद्र हिरानंदानी अगोदरच तीन मुलींचे वडील होते. अलकासोबत लग्नगाठ बांधण्यासाठी सुरेंद्रने आपल्या ३० वर्षांच्या सुखी संसाराचा त्याग केला. २०११ मध्ये त्याने त्याच्या पहिल्या पत्नी प्रीतीला सोडले होते. बहिणीच्या ह्या हट्टापुढे अक्षय कुमारने सुद्धा हार मानली. शेवटी त्याने सुद्धा हे नाते स्वीकारले. हिरानंदानी हे नाव ऐकल्यावर सिर्फ नाम ही काही है असंच काहीसं वाटतं. भारताच्या अनेक मोठ्या शहरात मोठे मोठे टॉवर्स आहेत. हिरानंदानी शाळा, हिरानंदानी हॉस्पिटल्स आणि सुरेंद्र हिरानंदानी स्वतः ‘हाऊस ऑफ हिरानंदानी’ चे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. ‘हाऊस ऑफ हिरानंदानी’ एक टॉप बिजनेस ग्रुप आहे, जो भारतात हाऊसिंग आणि रिअल इस्टेटच्या सेक्टरमध्ये काम करतो.
अलका भाटिया चित्रपट निर्माती आहे, २०१४ साली आलेल्या ‘फगली’ या चित्रपटाची ती प्रोड्युसर होती. सद्यस्थितीत अलका आणि सुरेंद्र आपले वैवाहिक आयुष्य अगदी आनंदाने जगत आहेत. लग्नानंतरसुद्धा अक्षय कुमार आणि त्याची बहीण एकाच इमारतीत वेगवेगळ्या मजल्यावर राहतात. जी व्यक्ती भारताच्या सर्वात १०० श्रीमंत व्यक्तींपैकी एक असेल तर तुम्हांला अंदाज आलाच असेल कि त्या व्यक्तीची कमाई किती असेल.