‘बालिका वधू’ साठी बॉलीवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रीने दिले होते ऑडिशन, त्यावेळी ती फक्त इतक्या वर्षाची होती…

2 Min Read

सिट विद हिटलिस्टचा होस्ट मयंक शेखरच्या एका मुलाखतीमध्ये आलियाने आपल्या लाईफबद्दल अनेक अपडेट दिल्या आहेत. जेव्हा आलियाला विचारले गेले कि ब्लॅक साठी देखील तू ऑडिशन दिले आहे आणि संजय लीला भंसाळी तुझ्यासोबत बालिका वधू नावाचा चित्रपट देखील करणार होते आणि त्यावेळी तिचे वय किती होते.

आलिया भट्टने प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले कि जेव्हा त्यांनी चित्रपट बवण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा मी ९ वर्षाची होते आणि त्यांनी मला म्हंटले कि यासाठी मला अजून काही वर्षे वाट पाहायला हवी पण नंतर त्यांनी हा चित्रपट बनवण्याचा निर्णय बदलला. आलिया म्हणाली कि आज देखील ते मला म्हणतात कि मी हा निर्णय घ्यायला नको होता. कारण तो इतका फेमस शो बनला होता.

आलिया पुढे म्हणाली कि आम्ही बालिका वधूसाठी कॉस्ट्यूम रिहर्सल, लुक-टेस्टपण केली होती. इतकेच नाही तर मी पुढे डोला रे डोला गाण्यावर डांस केला आणि ते सर्व ऑडिशनमध्ये होते. पण नंतर मला माहित नाही कि काय झाले. मी परत शाळेत जाऊ लागले.

त्यांनी चित्रपट बनवण्याचा निर्णय बदलला. पण त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा मला नेहमीच राहिली. आलिया म्हणाली कि जेव्हा ती चित्रपटामध्ये आली तेव्हा तिने सांगितले कि सर फक्त मोठ्या कलाकारांसोबतच काम करतात. मला माहित होते कि मला पण ती संधी मिळेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या तिच्या प्रेग्नंसी पीरियड़ला एन्जॉय करत आहे. आलिया आणि रणबीरने अनेक दिवसांच्या डेटिंग नंतर एप्रिलमध्ये लग्न केले होते. ते ब्रम्हास्त्र चित्रपटा दरम्यान जवळ आले होते. ९ सप्टेंबर २०२२ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. याशिवाय यामध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत. तर आलिया नुकतेच डार्लिंग्स चित्रपटामध्ये दिसली होती जो तिचा पहिला प्रोडक्शन चित्रपट आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *