रणबीर कपूरच्या घराबाहेर या अवतारात दिसली आलिया भट !

3 Min Read

आलिया भटला बॉलीवूड ची क्युट एक्ट्रेस म्हटलं तर काही वावगे ठरणार नाही. तसेच बॉलिवूडचा हॅण्डसम ऍक्टर म्हणून रणबीर कपूरचे नाव घेतले जाऊ शकते. मागील काही महिन्यांपासून रणबीर आणि आलिया सतत एकत्र दिसत आहेत. त्यामुळे हे दोघे नात्यात असल्याची चर्चा संपूर्ण सिनेसृष्टीत रंगली आहे. मीडियामध्ये तर या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. आता रणबीर आणि आलिया नक्की कधी व कोठे लग्न करतील हे सांगू शकत नाहीत परंतु यांच्यामध्ये काहीतरी चालले आहे हे नक्की.

रणबीर आणि आलिया मधील जवळीक ही ब्रह्मास्त्र चित्रपटाचे चित्रीकरणादरम्यान झाली. या वर्षी त्यांना अनेक इवेंट्स आणि ह्या अवॉर्ड शो मध्ये एकत्र पाहिले गेले. त्याचप्रमाणे आफ्रिका मध्ये दोघांना सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. एवढेच नव्हे तर दोघांची कुटुंबे देखील एकत्र येऊ लागली आहेत. रणबीरला आलिया च्या घरी पाहिले गेले आहे तर आलिया सुद्धा अनेकदा रणबीरच्या कुटुंबासोबत वेळ घालताना दिसते.

हल्ली आलियाला रणबीर कपूरच्या घराबाहेर पडताना पाहिले गेले. त्यावेळी आलियाने निळ्या रंगाची डेनिम जीन्स आणि स्किन कलरचा टॉप आणि त्यावर क्रॉप जॅकेट घातले होते. तिच्या या लुकमध्ये ती खूपच बिनधास्त आणि कुल दिसत होती.
सध्या आलिया संजय लीला भन्सालीच्या गंगुबाई काठीयावाडी या चित्रपटासाठी चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झाला त्यामध्ये आलिया एकदम हटके अंदाजात दिसून आली. आलियाने इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकल्यापासून खूपच कमी वेळात तिने भरपूर यश संपादन केले. आता तिचे नाव टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. आली आणि तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले तसेच त्यात खूप चांगला परफॉर्मन्स ही करून दाखवला. नुकताच रिलीज झालेला गंगुबाई काठीयावाडी या चित्रपटाचा पोस्टर बघता हा चित्रपट देखील एकदम जबरदस्त परफॉर्मन्स देणारा ठरेल असेच प्रथमदर्शनी दिसते.
या चित्रपटात व्यतिरिक्त आलिया तिच्याच वडिलांच्या म्हणजेच महेश भट यांच्या सडक २ या चित्रपटामध्ये देखील काम करीत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आदित्य रॉय, पूजा भट आणि संजय दत्त दिसणार आहेत. तसेच आलिया करण जोहरच्या तख्त या चित्रपटांमध्ये देखील काम करीत आहे. यामध्ये तिच्यासोबत करीना कपूर खान रणवीर सिंह जानवी कपूर आणि विकी कौशल अशी तगडी स्टारकास्ट असेल.
रणवीर कपूर आणि आलिया यांच्यातील जवळीक ब्रह्मास्त्र चित्रपटामुळे वाढली. या चित्रपटात या दोघांव्यतिरिक्त अमिताभ बच्चन, मोनि रॉय, नागार्जुन यांसारखे मोठे कलाकार आहेत. आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आलिया व रणबीर यांचे नाते पुढे कायम टिकून राहते की सध्या हा केवळ प्रमोशनसाठी केलेला पब्लिसिटी स्टंट आहे हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *