आमीर खानचा भाऊ फैजल खान सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि त्याला सलमान खानचा शो बिग बॉसमध्ये ऑफर मिळाली आहे. पण त्याने यामध्ये सामील होण्यास नकार दिला आहे. नुकतेच त्याने एका मुलाखतीमध्ये बॉलीवूड बायकॉट, नेपोटिज्म आणि वादग्रस्त रियालिटी शो बिग बॉसबद्दल वक्तव्य केले आहे.

त्याने एका मुलाखतीमध्ये म्हंटले कि बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त करप्शन आहे. या लाईनमध्ये सर्वात जास्त घराणेशाही पाहायला मिळते. त्याने बॉलीवूड इंडस्ट्रीवर आरोप लावताना म्हंटले कि इथे फक्त से क्स बद्दलच विचार केला जातो. हे सर्व चित्रपट, कपडे आणि कंटेंटमध्ये देखील पाहायला मिळते. यादरम्यान फैजलने रिमेक बनवणाऱ्यांवर देखील भडास काढली.

मुलाखतीमध्ये फैजल खानने बॉलीवूड इंडस्ट्री बद्दल म्हंटले कि संपूर्ण इंडस्ट्री भ्रष्टाचाराने भरली आहे. इथे जास्त घराणेशाही पाहायला मिळते. तो हे देखील म्हणाला कि घराणेशाहीमुळे काम तर मिळते पण ते जास्त दिवस टिकत नाही. कारण पुढे तर स्वतःलाच इमेज बनवावी लागते. लोक तुमचे काम पाहून तुम्हाला निवडतात.

फैजल खानने मुलाखतीदरम्यान अशा लोकांवर देखील भडास काढली जे रिमेक बनवतात. तो म्हणाला कि आम्ही लोक फक्त साउथ चित्रपटांवर रिमेक बनत आहोत. आपल्याजवळ क्रिएटिविटी संपली आहे आणि चांगले रायटर देखील राहिले नाहीत.

पण साउथ वाल्यांजवळ ओरिजन कंटेंट आहे. ते आपले चित्रपट इमानदारीने बनवत आहेत आणि हेच कारण आहे कि त्यांचे चित्रपट हिंदी बेल्टमध्ये देखील पसंद केले जात आहेत. त्यांनी बॉलीवूड स्टार्सच्या इमेजबद्दल बोलताना म्हंटले कि इथे सेलेब्सची नावे ड्र ग्स केसमध्ये येत आहेत. इंडस्ट्रीला आपली इमेज सुधारण्याची गरज आहे.

फैजल खानच्या बॉलीवूड करियरबद्दल बोलायचे झाले तर तो सुपर फ्लॉप राहिला आहे. त्याने आपल्या करियरमध्ये मेला, दुष्मनी, मदहोश, डेंजर, कयामत से कयामत तक फॅक्टरी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतेच त्याने सांगितले कि त्याला टीव्ही शोजची ऑफर मिळत आहे. बिग बॉसची ऑफर त्याने नाकारली आहे.