बॉलीवूडमध्ये शहेनशाह म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन तसे तर लोकांना चुका न करण्याचा सल्ला देत असतात, परंतु तुम्हाला माहिती आहे का कि त्यांच्यासुद्धा एका चुकीमुळे अनेक लोकांची नोकरी जाऊ शकत होती. होय हि गोष्ट खरी आहे.

तुम्हाला हि गोष्ट माहिती नसेल कि अभिषेक बच्चनच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन यांनी आनंदामुळे असे काम केले होते जे इतके चुकीचे होते कि त्यामुळे अनेक लोकांची नोकरी जाऊ शकत होती. अमिताभ बच्चनला त्यावेळी आपल्या चुकीचा जरासुद्धा पश्चाताप नव्हता, परंतु आज त्यांना या चुकीचा पश्चाताप होत आहे.अमिताभ बच्चनने एका मुलाखतीदरम्यान सांगितले कि, अभिषेक बच्चनच्या जन्मानंतर जेव्हा डॉक्टरने त्यांना सांगितले कि त्यांना मुलगा झाला आहे त्यावेळी आनंदाच्या भरात ते सर्व काही विसरून गेले आणि अशातच त्यांनी आनंदामध्ये डॉक्टरांना आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या नर्सला वाईन पाजली. ज्यामुळे त्या डॉक्टर्स आणि नर्सची नोकरी जाऊ शकत होती, कारण कोणीतरी त्यांची तक्रार केली होती कि ड्युटीवर असताना त्यांनी दारू प्यायली होती.
जेव्हा हि गोष्ट अमिताभ बच्चन यांना समजली त्यावेळी त्यांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन लोकांशी सवांद साधला आणि नंतर त्यांची नोकरी वाचवली. अभिषेकचा जन्म झाल्यानंतर अमिताभ बच्चन इतके खुश झाले होते कि त्यांना चुकीचे काय आणि बरोबर काय हे समजले देखील नाही आणि त्यांनी ड्रायव्हरपासून नोकरांपर्यंत प्रत्येकाला पैसे आणि मिठाई वाटली होती. बिग बीना आता पश्चाताप होत आहे कि त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नियमांचे उल्लंघन करायला नको पाहिजे होते आणि त्याचबरोबर त्यांचे हे देखील म्हणणे आहे कि कोणतेही नियम तोडणे हे एका चांगल्या नागरिकाचे लक्षण नसते.