अमिताभ बच्चन यांनी केली २८०० कोटींच्या संपत्तीच्या वारसदाराची घोषणा, वाचून विश्वास नाही बसणार !

5 Min Read

बिग बी अमिताभ बच्चन गेल्याच महिन्यात ७७ वर्षांचे झाले आणि ह्याच वर्षी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सुद्धा सन्मानितही करण्यात आले. देशात आणि विदेशात लोकप्रिय असलेल्या बिग बींनी फिल्म इंडस्ट्री मध्ये ५० वर्ष पूर्ण केली आणि त्यांच्या अभिनयाने लोकांना खिळवून ठेवलं त्यामुळेच त्यांना महानायक ही उपाधी दिली गेली आहे. अमिताभ बच्चन ह्यांच्याकडे जवळपास २८०० कोटींची संपत्ती आहे. ते प्रत्येक चित्रपटासाठी ७ कोटी रुपये घेतात, ह्याव्यतिरिक्त जर त्यांनी कोणती जाहिरात केली तर प्रत्येक जाहिरातीचे ते ५ कोटी रुपये घेतात.

५०० रुपये महिना पगारवर केलं आहे काम :- अमिताभ चित्रपटांमध्ये येण्याअगोदर नोकरी करत होते. स्वतः अमिताभ बच्चन ह्यांनी आपल्या कौन बनेगा करोडपती ह्या शो मध्ये सांगितलं कि ते कलकत्त्याला नोकरीला होते आणि ५०० रुपये महिना पगारवर काम करायचे. त्यानंतर त्यांचा पगार वाढवून ८०० रुपये करण्यात आला होता. त्यांनी तेव्हा तिथे ७-८ वर्ष नोकरी केली होती आणि त्यानंतर चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ते एका स्पर्धकाच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले कि, ते आधी कलकत्त्याला राहायचे आणि एका “मॅनॅजिंग एजन्सी होम” नावाच्या कंपनीत एक्सजेकटिव पदावर काम करायचे.

ट्विट करून दिली माहिती :- अमिताभ बच्चन ह्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करून माहिती दिली ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते कि माझ्या मृत्यू नंतर माझी संपत्ती त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता ह्यांना समान वाटली गेली पाहिजे. माझ्या संपत्तीवर हक्क एकट्या अभिषेकचा नसेल.

९०% झाला होता नफा :- अमिताभ बच्चन ह्यांनी १६५ कोटींची पर्सनल इन्व्हेस्टमेंट केली आहे. एका रिपोर्ट नुसार मागील ३ वर्षात त्यांच्या संपत्ती मध्ये ९० टक्क्यांची वाढ झाली आहे. ते दर वर्षी ५४ कोटी रुपये कमावतात. सध्या ते कौन बनेगा करोडपती हा शो होस्ट करत आहेत. हल्लीच आलेला त्यांचा बदला हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर ८५ कोटी रुपये कमावले आहेत.

४ बंगल्यांचे आहेत मालक :- अमिताभ बच्चन भारतीय फिल्म इंडस्ट्री मध्ये पहिल्या १० लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. प्रॉपर्टी मध्ये सुद्धा त्यांनी भरपूर गुंतवणूक केली आहे. आताच्या घडीला त्यांच्याकडे ४ बंगले आहेत. बिग बींच्या प्रतीक्षा बंगल्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्या अजूनही काही घरांबद्दल सांगणार आहोत. चला पाहुयात किती आहेत अमिताभ बच्चन ह्यांच्याकडे बंगले आणि आणि काय आहे त्यांची किंमत?

१६० कोटींचा प्रतीक्षा बंगला :-  अमिताभ बच्चन ह्यांचे मुख्य निवासस्थान जलसा बंगला आहे. त्यांचे पूर्ण कुटुंब प्रतीक्षा बंगल्यावरच राहते. प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी ह्यांनी हा बंगला अमिताभ ह्यांना “सत्ते पे सत्ता” चित्रपटाचे मानधन म्हणून दिला होता. हा १०,१२५ वर्ग फूट चा भव्य बंगला आहे जो पर्यटकांना खूप आकर्षित करतो. ह्या व्यतिरिक्त बच्चन कुटुंबाकडे प्रतीक्षा नावाचा ही बंगला आहे. प्रतीक्षा बंगला अमिताभ ह्यांना वारसाहक्काने मिळालेलं घर आहे.

अमिताभ आपले वडील हरिवंशराय बच्चन आणि आई तेजाजी बच्चन ह्यांच्यासहित प्रतीक्षा बंगल्यावर राहायचे. प्रतीक्षा बंगल्याची किंमत जवळपास १६० कोटी रुपये आहे. बिग बींनी जवळपास ३०० करोड डॉलर्स ची गुंतवणूक रियल इस्टेट मध्ये करून ठेवली आहे. ह्याव्यतिरिक्त बिग बींकडे झनक नावाचा बंगला सुद्धा आहे जिथे त्यांचं ऑफिस आहे. हे जलस्यांपासून ५० किलोमीटर दूर आहे. ह्या बंगल्यात एक जिम सुद्धा आहे ज्यात पूर्ण बच्चन कुटुंब व्यायाम करतं.

आहेत इतक्या गाड्यांचे मालक :- अमिताभ ह्यांना रुबाबात राहायला खूप आवडते आणि ह्याचा प्रत्यय त्यांनी खरेदी केलेल्या गाड्यांमधूनच दिसून येतो. ऐकून हैराण व्हाल, अमिताभ बच्चन ह्यांच्याकडे चार, पाच, आठ नाही, तर तब्ब्ल अकरा गाड्या आहेत! त्यामध्ये मर्सिडीज, बी एम डब्लू , पोर्ष लेक्सस आणि फँटम सारख्या महाग लक्सरी गाड्या आहेत. ही एक अशी कार आहे ज्यांच्या एका टायर ची किंमत अडीज लाख रुपये आहे. ह्या व्यतिरिक्त बिग बींना महाग घड्याळांचा हि शौक आहे.शेयर बाजारातही केलीये करोडोंची गुंतवणूक :- ह्या व्यतिरिक्त अमिताभ ह्यांनी शेयर बाजारातही करोडोंची गुंतवणूक केली आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास जस्ट डायल कंपनी चे शेयर्स जेव्हा लाँच झाले होते तेव्हा त्याच्या एका शेयर ची किंमत दहा रुपये होती. बिग बींनी ६.६७ लाखांमध्ये ६२,७९४ शेयर्स खरेदी करून काही वर्षांपूर्वी ११५० रुपयांच्या किमतीवर ७.२२ कोटींना विकले.

ह्या शेयर्स मधून बिग बींनी ११४०० पटींनी नफा कमावला. साल २०१८ मध्ये अमिताभ बच्चन ह्यांची कमाई ९६ कोटी रुपये होती आणि ते फोर्ब्स च्या लिस्ट मध्ये सातव्या क्रमांकावर होते. बिग बींचे फॅन असाल तर पोस्ट शेयर करायला विसरू नका. आणि त्यांचा तुम्हाला आवडलेला चित्रपट कमेंटबॉक्स मध्ये सांगायलाही विसरू नका.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *