बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांना कोरोनाव्हायरस ची लागण झाली होती, त्यावर त्यांनी मात करून पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात केली आहे. बिग बीने सध्या कौन बनेगा करोडपती १२ च्या शूटिंगची सुरुवात केली आहे. कोरोनाव्हायरस वर मात करून बिग मी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले आहेत. या दरम्यान बिग बीच्या घरात आणखी एका नवीन कारची एन्ट्री झालेली आहे. एका न्यूज रिपोर्टनुसार महानायक अमिताभ बच्चन यांनी S Class मर्सडीज खरेदी केली आहे.S Class मर्सडिज कार ही भारतात आत्ताच लॉन्च झालेली आहे. ही कार जवळ पास कोट्यावधी रुपयाची आहे. S Class मर्सडीज या कारची किंमत इंटरनेटवरील माहितीनुसार अंदाजे एक कोटी 38 लाख रुपये एवढी आहे. या कारचे आरटीओ रजिस्ट्रेशन महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावाने झालेले आहे. बिग बिच्या या कार चे फोटोज विरल भयानीच्या ऑफिशियल इंस्टाग्राम या अकाउंट वर खूपच व्हायरल झालेले आहेत.अमिताभ बच्चन यांच्याकडे अनेक कंपनीच्या अनेक कार आहेत. अमिताभ बच्चन यांच्याकडे रोल्स रॉयल ही देखील एक कार आहे आणि अमिताभ बच्चन यांच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका S Class मर्सिडीज कारचा समावेश झाला आहे. बिग बीच्या एस क्लास मर्सडीज या कार्डचा नंबर ही खूप खास आहे.

अमिताभ बच्चन यांच्या नवीन एस क्लास मर्सडिज कार चा नंबर MH02FJ4041 हा आहे. या कारच्या नंबरची आकड्यांची बेरीज करून पाहिल्यास एकूण ११ टोटल होते. अमिताभ बच्चन यांना ११ हा आकडा लकी आहे. ते स्वतःसाठी ११ या आकड्याला लकी समजतात, तसेच अमिताभ बच्चन यांची जन्मतारीख पण ११ ऑक्टोंबर ही आहे.महानायक अमिताभ बच्चन सध्या कोण बनेगा करोडपतीच्या शूटींगमध्ये व्यस्त झालेले आहेत. बिग बीने रविवारी त्यांच्या या शोचा धमाकेदार प्रोमोहि रिलीज केला आहे. हा प्रोमो त्यांच्या ऑफिशिअल फेसबुक व ट्विटर अकाउंटवर पाहायला मिळेल. व या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन आणि त्यांच्या पहिल्या एपिसोड मधील सर्व स्पर्धक ही दिसत आहेत. हा शो लवकरच सोनी या टेलिव्हिजनवर दाखवण्यात येणार आहे.
अमिताभ बच्चन यांना कोरोनाव्हायरस चा संसर्ग झाल्यानंतर हे आपल्या चाहत्यांचा उत्साह टिकून ठेवण्यासाठी सोशल मीडियावर खूपच अपडेट होते. कोण बनेगा करोडपतीची शूटिंगची सुरुवात झाल्यानंतर ही त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे फोटो शेअर केले. बिग बि सध्या कोरणा व्हायरस प्रतिबंधक सर्व खबरदारी घेऊन आपल्या शोचे चित्रीकरण पार पाडत आहेत. कोरोनाव्हायरस मुळे सेटवरील वातावरणात खूपच बदल करण्यात आला आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.