टीव्ही सिरीयल बालिका वधू मधून घरा-घरामध्ये लोकप्रिय झालेली अभिनेत्री अविका गौर २३ वर्षांची झाली आहे. अविका गौर जेव्हा फक्त ११ वर्षांची होती तेव्हा तिने सिरियल्समध्ये काम करायला सुरुवात केली होती. तथापि काही काळापूर्वी तिचे १८ वर्षाने मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत अफेयर होण्याच्या बातम्या खूपच आल्या होत्या. अविकाला लहानपणापासून अभिनयाची खूप आवड होती.अविकाला बालिका वधू सिरीयल मधून खूपच लोकप्रियता मिळाली. याआधी तिने राजकुमार आर्यन, मेरी आवाज को मिल गई रोशनी, करम अपना-अपना सारख्या सिरियल्समध्ये काम केले. अविका २०११ मध्ये ससुराल सिमर का मध्ये देखील पाहायला मिळाली होती. त्यावेळी अविकाने एक विवाहित महिलेची भूमिका साकारली होती. पण तेव्हा ती फक्त १४ वर्षांची होती.
अभिनेता मनीषने तिच्या पतीची भूमिका साकारली होती. तथापि यादरम्यान अविका आणि मनीषच्या अफेयरच्या बातम्या येऊ लागल्या. त्यावेळी अविका फक्त १६ वर्षांची होती. तर मनीष रायसिंघानी ३४ वर्षांचा होता. एका मुलाखतीमध्ये अविकाने म्हंटले होते कि मी आणि मनीष चांगले मित्र आहोत आणि आम्हाला या गोष्टीचा काही फरक पडत नाही कि लोक आमच्याबद्दल काय म्हणतात.
अविकाने सांगितले कि जेव्हा आमच्या दोघांबद्दल अशा बातम्या येऊ लागल्या होत्या तेव्हा मी मानसिक आणि शारीरिक रूपाने आजारी राहू लागले होते. यामुळे आम्ही एकमेकांसोबत बोलणे देखील बंद केले होते. पण नंतर देखील आमच्या लिंकअप बद्दल बातम्या येणे बंद झाले नाही, मग नंतर आम्ही दोस्त राहण्याचा निर्णय घेतला.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.