चित्रपट निर्माता करण जौहरचा चॅट शो कॉफी विथ करण सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. शोचा ७ वा सीजन सुरु आहे. शो च्या पुढच्या एपिसोडमध्ये साउथचा सुपरस्टार विजय देवराकोंडा आणि बॉलीवुड अभिनेत्री अनन्या पांडे पाहायला मिळणार आहेत. सीजनच्या चौथ्या एपिसोडचा प्रोमो व्हिडीओ मंगळवारी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज केला गेला. जो पाहिल्यानंतर एक गोष्ट तर स्पष्ट आहे कि पुढचा एपिसोड खूपच मसालेदार होणार आहे.

शोदरम्यान करणने नेहमी प्रमाणे आपल्या पाहुण्यांचे स्वागत मजेदार प्रश्नाने केले. यादरम्यान करणने आपल्या एका पार्टीचा देखील उल्लेख केला आणि अनन्याला म्हंटले कि या पार्टीमध्ये त्याने काही पाहिले होते. करणचे म्हणणे ऐकल्यानंतर अनन्या घाबरली आणि म्हणाली नाही नाही तू काहीच पाहिले नाहीस.

यानंतर करण जौहरने अनन्या पांडेला विचारले कि तुझ्यामध्ये आणि आदित्य रॉय कपूर दरम्यान काय सुरु आहे ? प्रोमोमध्ये करण प्रश्न विचारताना पाहायला मिळत आहे पण अनन्याने काय उत्तर दिले हे शोच्या टेलीकास्ट दरम्यानच दर्शकांना समजणार आहे.

शोच्या दरम्यान मजेदार क्षण तेव्हा आला जेव्हा करण जौहरने विजयला विचारले कि तू लास्ट टाईम से क्स कधी केला होतास ? करणच्या या चावट प्रश्नाचे विजय उत्तर देणारच होता कि अनन्या पांडेने आपल्या अंदाजामध्ये म्हंटले कि आज सकाळीच. अनन्या पांडेचे हे उत्तर ऐकल्यानंतर विजय खूपच हैराण दिसला तर करण जौहर हसू लागला.

याशिवाय करणने विजयला हे देखील विचारले कि तू कधी थ्रीसम केले आहे का ? या प्रश्नांचे उत्तर देताना विजय म्हणाला कि नाही कधीच नाही. जेव्हा करणने विचारले कि तुला थ्रीसम करायचे आहे का ? यावर विजय म्हणाला कि मला काहीच हरकत नाही.