नेटफ्लिक्सवर फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईफ सीझन २ रिलीज झाला आहे. यामध्ये महीप कपूर, नीलम कोठारी, भावना पांडे आणि सीमा सजदेहचे लाईफ दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबर शोमध्ये त्यांची मुले देखील आपल्या पर्सनल लाईफबद्दल डिस्कस करताना दाखवले गेले आहे.

मग ती भावनाची मुलगी अनन्या पांडे असो किंवा महीपची मुलगी शनाया कपूर. इतकेच नाही तर शाहरुख खान आणि गौरी खानची सुंदर मुलगी सुहाना खानचा देखील यामध्ये उल्लेख आहे. अनन्या , सुहाना आणि शनाया खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.

तिघींच्या आईदेखील एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. लोकप्रियतेच्या बाबतीत तिघी देखील पुढे आहेत. चाहते त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. अनन्याने बॉलीवूडमध्ये कधीच एंट्री केली आहे. नुकतेच ती साउथ स्टार विजय देवरकोंडासोबत लायगर चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती.

सुहानाबद्दल बोलायचे झाले तर ती द आर्चीज चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी तयार आहे. चित्रपट रिलीजसाठी देखील तयार आहे. तर शनायाला देखील करण जौहरने लाँच करण्याची तयार सुरु केली आहे. त्यामुळे लवकरच तिघी आता बॉलीवूडमध्ये काम करताना पाहायला मिळणार आहेत.

अनन्या सुहाना आणि शनायाच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर त्याची झलक फेब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलीवूड वाईफच्या नवीन सीजनमध्ये पाहायला मिळाली आहे. एका एपिसोडमध्ये अनन्या आणि शनाया आपल्या वेडिंगबद्दल डिस्कस करताना दिसत आहेत. लग्नाबद्दल अनन्याची स्वप्ने खूप आहेत आणि ती हा देखील खुलासा करते कि तिचे किती वेडिंग फंक्शन होतील आणि तिला किती लग्न करायचे आहेत.

सर्वात पहिला लग्न कोण करेल यावर देखील अनन्या आणि शनाया चर्चा करतात दिसतात. शनाया म्हणते कि मला वाटते आमच्या दोघांमध्ये पहिला तूच लग्न करशील. यावर अनाया लगेच आपली सहमती दर्शवते आणि म्हणते कि ती याची वाट पाहत आहे. शनाया नुसार पहिला अनन्या नंतर सुहाना आणि सर्वात शेवटी ती लग्न करेल. शनाया देखील खुलासा करते कि ती ट्रेडिशनल वेडिंग करू इच्छिते. यावर अनन्या म्हणते कि तिला तीन लग्न करायचे आहेत. तिला हे फंक्शन म्हणून करायचे आहे.