बॉलीवूड फिल्मी जगतामधील कलाकारांकडूनसुद्धा अशा काही चुका होतात ज्यामुळे त्यांना नंतर पश्चाताप होतो. असे अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळाले आहे कि, जेव्हा एखाद्या अभिनेत्याने चित्रपट रिजेक्ट केल्यानंतर त्याचा फायदा दुसऱ्या अभिनेत्याला होतो. असेच काही अनिल कपूरबरोबर सुद्धा झाले आहे. जेव्हा अमिताभ बच्चनने चित्रपट रिजेक्ट करण्याची चूक केली होती आणि अनिल कपूरला त्याचा खूपच फायदा झाला होता.

हि गोष्ट आहे १९८७ मधील आहे जेव्हा सलीम-जावेदची जोडी मिस्टर इंडिया या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहित होते. हा चित्रपट बोनी कपूर प्रोड्यूस करणार होते आणि चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शेखर कपूरच्या हातामध्ये होती. त्या काळात शेखर कपूर आणि बोनी कपूरने सलीम-जावेदला चित्रपटाचा लीड हिरो म्हणजेच मिस्टर इंडियाची भूमिका अमिताभ बच्चनला समोर ठेऊन लिहिण्यासाठी सांगितले होते.चित्रपटाची स्क्रिप्ट लिहून पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी हा चित्रपट अमिताभ यांना ऑफर करण्यात आला त्यावेळी त्यांनी तो करण्यास नकार दिला. अमिताभ बच्चनने भूमिका साकारण्यास यामुळे नकार दिला कारण चित्रपटामध्ये काही ठिकाणी ते दिसू शकणार नव्हते आणि अनेक सीन मध्ये फक्त त्यांचा आवाज ऐकू येणार होता. हि कल्पना त्यांना पसंत आली नाही आणि त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला.

एका इंटरटेनमेंट वेबसाईटच्या मते अमिताभ बच्चननंतर हि भूमिका राजेश खन्ना यांना ऑफर करण्यात आली होती. परंतु हेच कारण देऊन त्यांनीहि हा चित्रपट नाकारला. शेवटी हि गोष्ट बोनी कपूरला समजली तेव्हा त्याने आपला भाऊ अनिल कपूरलाच मुख्य भूमिका देण्याचे ठरवले.चित्रपट बनला आणि ब्लॉकबस्टर ठरला. इतकेच नव्हे तर या चित्रपटानंतर अनिल कपूरचे नाव फिल्म इंडस्ट्रीमधील मोठ्या कलाकारांमध्ये घेतले जाऊ लागले. कारण या चित्रपटाच्या अगोदर अनिल कपूरचे फक्त दोनच चित्रपट हिट झाले होते. यामध्ये मेरी जंग आणि कर्मा हे चित्रपट सामील आहेत. जे काही असो परंतु अमिताभ यांच्या एका चुकीमुळे बॉलीवूडला अनिल कपूरच्या रुपामध्ये एका मोठा सुपरस्टार जरूर मिळाला.