बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरची मुलगी रिया कपूरचा आज वाढदिवस आहे. रिया कपूरने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. ती एक फॅशन स्टायलिस्ट आहे आणि तिची बहिण सोनम कपूरसोबत मिळून एक ब्रँड सुद्धा चालवते. रिया कपूरने २०१० मध्ये आयशा चित्रपट बनवला होता, ज्यामध्ये सोनम कपूर मुख्य भूमिकेमध्ये होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाल दाखवू शकला नाही.

रियाने यानंतर खुबसुरत चित्रपट बनवला होता जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. यानंतर रियाने वीरे दी वेडिंग हा चित्रपट प्रोड्यूस केला ज्यामध्ये करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर सारख्या अभिनेत्री पाहायला मिळाल्या होत्या. या चित्रपटामुळे खूप वाद निर्माण झाले होते. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला.रिया कपूर बराच काळ करण बूलानीला डेट करत आहे. दोघांचे फोटो सोशल मिडियावर नेहमी व्हायरल होत असतात. अशामध्ये बातमी आहे कि दोघे यावर्षी लग्न करू शकतात. रिया आपल्या बोल्ड अंदाजामुळे खूप प्रसिद्ध आहे.रियाच्या याच खासपणामुळे चित्रपटसृष्टीतील लोकच नाही तर तिचे फॅन्ससुद्धा तिला खूप पसंत करतात. रिया कपूरने सोनमसोबत आपला रेसन क्लॉथिंग ब्रँड लॉन्च केला होता.