अख्या देशाला धीना धीन धा च्या तालावर नाचवणारे आणि माय नेम इज लखन म्हणत एका दिवसाचे मुख्यमंत्री बनणारे बॉलीवूड चे नायक म्हणजे अनिल कपूर ह्यांनी ६२ वर्षांचे असून सुद्धा एखाद्या तरुणाला सुद्धा लाजवेल असा फिटनेस ठेवला आहे. त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीतल्या सर्वात फिट कलाकारांपैकी एक मानले जाते. आपल्या फिटनेस चं रहस्य उघड करताना ते म्हणाले, “माझे ट्रेनर्स माझे व्यायामप्रकार सतत बदलत असतात, ज्याने माझे शरीर कुठल्या एका व्यायाम प्रकाराशी सहज होणार नाही. पण उद्देश हा कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग मध्ये चांगले संतुलन राहावे असा आहे.

खाण्या पिण्याच्या बाबतीत विचारले असता ते म्हणाले, ” मी कोणत्याही विशेष डाएट प्लॅन ला फॉलो करत नाही. मी तेच खातो जे माझ्या शरीराला उपयुक्त आहे. आणि नॉर्मली ते पौष्टिक आणि साधे जेवण असते.” अनिल कपूर हे चांगले धावक सुद्धा आहेत. हल्लीच त्यांची भेट जैमेका चा अनुभवी धावक योहान ब्लॅक शी त्याच्या भारत दौऱ्यावर असताना झाली. योहान ब्लॅक भारतात रस्ते सुरक्षा वर जागरूकता करण्यासाठी आला होता.अनिल कपूर म्हणाले कि दोघांनी भेटीमध्ये तब्बेत आणि फिटनेस च्या व्यतिरिक्त समान आवडी निवडी आणि व्यायामाबाबत पण चर्चा केली. ब्लॅक शी भेटून आपला अनुभव सांगताना अनिल कपूर म्हणाले कि “मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कि मला योहान शी भेटून त्यांच्याकडून खूप काही समजून घेण्याची संधी मिळाली. तो खूप पेशेवर आहे.

ऐंशी च्या दशकात जेव्हा अनिल कपूर ला स्टारडम मिळाले तेव्हा अभिनेत्यांसाठी फिटनेस ला प्राथमिकता नव्हती. जेव्हा त्यांना विचारले गेले कि आजकाल चे अभिनेते फिटनेस वर जास्त लक्ष देतात असं तुम्हाला वाटतं का? तर त्यांनी हसत उत्तर दिलं “हो हे अगदी बरोबर आहे. आजकालचे युवक आरोग्य आणि फिटनेस च्या मागचे विज्ञान नक्कीच जाणतात आणि त्यामुळे ते स्वतःसाठी योग्य गोष्टीं निवडण्या लायक आहेत.अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला उर्जावान बनवते? ह्याचे उत्तर देताना अनिल कपूर म्हणाले, “जुनून, कठोर परिश्रम आणि जीवना प्रति उत्साह”. अनिल कपूर ४ दशकांनंतरही बॉलीवूड मध्ये सक्रिय आहेत. ह्या वर्षी त्यांची एक लड़की को देखा तो ऐसा लगा, टोटल धमाल आणि पागलपंती हे चित्रपट रिलीज झाले आहेत. ते आपल्याला मलंग आणि तख्त ह्या आगामी सिनेमातून आपल्याला दिसून येतील.

अनिल कपूर ह्यांनी आतापर्यंत १३८ चित्रपटांमध्ये काम केले असून त्यामध्ये स्लमडॉग मिलेनियर, मिशन इम्पॉसिबल – घोस्ट प्रोटोकॉल सारख्या मोठ्या हॉलीवूड चित्रपटातही काम केले आहे. २०१३ मध्ये हॉलिवूड सिरीज चा रिमेक २४ ह्या २४ एपिसोड्स च्या मालिकेतही त्यांनी मुख्य भूमिका केली असून ती मालिका खूप गाजली होती. पुढच्या वर्षी भारताचा एकमेव सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा च्या बायोपिक मधेही अनिल कपूर आपल्याला दिसून येण्याची शक्यता आहे. लेख आवडला असल्यास लाईक करून नक्की शेयर करा आणि तुम्हाला आवडलेली अनिल कपूर ची फिल्म कमेंट करायला विसरू नका.