अनिल कपूर यांचा शानदार बंगला बघून तुम्ही नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल !

3 Min Read

वय वाढत गेले तरी काही लोकांचे तारूण्य काही कमी होत नाही. वयासोबत ते तसेच चिरतरूण दिसत राहतात. अशा चिरतरूण दिसणाऱ्या अभिनेत्यांच्या फळीत अनिल कपूरचे नाव अग्रस्थानी असते. त्यांच्या दिसण्या सोबत असतात त्यांच्या अभिनयासाठी सुद्धा लोक चाहते आहेत. वयाच्या 63 व्या वर्षी सुद्धा अनिल कपूर यांची एनर्जी वीस- बावीस वर्षाच्या तरुणास लाजवेल अशीच आहे. अनिल कपूर यांच्याकडे बघून असे वाटणार नाही की ते सोनम कपूर व रिया कपूर यांच्यासारख्या मोठ्या मुलींचे वडील आहेत. याशिवाय त्यांच्या मजेशीर स्वभावासाठी सुद्धा ते जनमानसात प्रसिद्ध आहेत.

अनिल कपूर यांनी आपल्या कारकीर्दीत एकाहून एक सरस सुपरहिट चित्रपट दिले. फक्त बॉलिवुडचा नव्हे तर हॉलीवूड मध्ये सुद्धा अनिल कपूर यांना ओळखले जाते. या सर्व श्रेया पाठी त्यांनी केलेली इतक्या वर्षांची मेहनत ही वाखाणण्याजोगी आहे. या मेहनतीचे फळ म्हणून आज ते करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांचा स्वतःचा एक मोठा शानदार बंगला आहे. आजच्या लेखातून आम्ही तुम्हाला अनिल कपूरच्या या शानदार बंगल्याची सफर घडवून आणणार आहोत.अनिल कपूर यांचे यांच्या घरावर खास प्रेम आहे. या घराचे इंटेरियर नीट विचार करून, समजून घेऊन त्यांनी त्यांच्या पत्नीकडून करून घेतले आहे. अनिल कपूर जेथे कुठे जातात तेथून ते घराच्या सुशोभिकरणासाठी लागणाऱ्या वस्तू आठवणीने घेऊन येतात. त्यांचे हे शानदार घर त्यांची पत्नी सूनिता आहुजा यांनी सजवले आहे. घरातील अधिकतर वस्तू या अनिल कपूर यांच्या आवडीनिवडींचा विचार करूनच बनवल्या गेल्या आहेत. लग्नाच्या आधी अभिनेत्री सोनम कपूर ही अनिल कपूर सोबतच राहायची परंतु लग्न झाल्यानंतर आता ती तिचे पती आनंद आहुजा यांच्यासोबत राहते तर अनिल कपूर यांची दुसरी मुलगी रिया कपूर की अजूनही तिच्या वडिलांसोबतच राहते.अनिल यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात उमेश मेहरा यांचा १९७९ मध्ये आलेल्या हमारे तुम्हारे या चित्रपटांमधून केली होती. या चित्रपटांमधून ते एका सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसले होते. परंतु 1983 साली आलेल्या वो सात दिन या चित्रपटांमधून त्यांनी मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती. इथूनच हळू हळू संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये अनिल कपूर यांची एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळख निर्माण होत गेली. स्लमडॉग मिलेनियर ,सलाम -ए- इश्क ,बेवफा ,अरमान, नायक, एक लडकी को देखा तो ऐसा लगा, दिल धडकने दो, वेलकम, तेजाब, घर हो तो ऐसा यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये अनिल कपूर यांनी काम केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *