अनिल कपूरचे नाव त्या अभिनेत्यांमध्ये सामील आहे जे बदलत्या काळानुसार अधिकच हँडसम होत चालले आहेत. त्याचबरोबर ते एक उत्कृष्ठ अभिनेता देखील आहेत यामध्ये काही शंका नाही. ६३ व्या वर्षी देखील अनिल कपूरची एनर्जी लेवल पाहण्यासारखी आहे. त्यांची एनर्जी लेवल पाहून सध्याचा युवा वर्ग देखील शरमेने मान खाली घालतो. अनिल कपूरला पाहून कोणीच म्हणून शकत नाही कि त्यांना सोनम आणि रिया कपूरसारख्या दोन मुली आहेत.आजच्या या पोस्टमध्ये आम्ही अनिल कपूरबद्दल यासाठी बोलत आहोत कारण त्यांच्या लग्नाचा ३६ वा वाढदिवस नुकताच होऊन गेला आहे. १९८४ मध्ये अनिलने सुनिता सोबत लग्न केले होते. यानिमित्ताने अनिल कपूरने आपल्या इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट देखील शेयर केली होती ज्यामध्ये त्यांनी आपल्या लग्नाच्या काही आठवणी ताज्या केल्या.अनिल कपूरने फोटो शेयर करताना लिहिले होते कि १९ मे कसा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला दिवस बनला. मी सुनीताला प्रपोज केले आणि तिला पत्नी बनण्यासाठी विचारले. आमचे लग्न खूप वेळा टळले कारण माझी इच्छा होती कि तिची व्यवस्थित काळजी घ्यावी जसे ती डिजर्व करते. कमीत कमी माझी इच्छा होती कि तिच्यासाठी एक घर खरेदी करावे आणि एक कुक देखील ठेवावा.अनिलने पुढे लिहिले अनेक अडचणींनंतर १९ मेला आम्ही लग्न केले. मला आज देखील आठवते कि जेव्हा मी घरामध्ये गेलो आणि वधूला पाहिले तेव्हा मला हसू येत होते. माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. आनंद आणि नर्वसनेसचे अश्रू. आमचे लग्न एका दिवसाच्या तयारीमध्ये झाले. आमचे लग्न मोठे नव्हते आणि आम्ही हनिमूनला देखील गेलो नाही ज्यासाठी आजदेखील ती मला चिडवते पण हि माझी आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट होती.अनिलने पुढे लिहिले होते कि अनेक लोकांनी भविष्यवाणी केली होती कि लवकर लग्न करने माझ्या करियरसाठी चांगले नाही, पण मी माझ्या आयुष्याचा एक दिवस देखील तुझ्याशिवाय न राहता घालवू इच्छित नव्हतो आणि माझी इच्छा होती कि तू नेहमी सोबत राहावे. आमच्यासाठी कधीच हे करियर किंवा प्रेम नव्हते आमच्यासाठी हे प्रेम आणि करियर होते.अनिल कपूरची सुंदर पोस्ट चाहत्यांना खूपच पसंत आली होती आणि त्यांनी देखील एनिवर्सरीच्या शुभेच्छा दिल्या होता. अनिल कपूरची पत्नी सुनिता खूपच ग्लॅमरस असून देखील फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहिली. अनिलप्रमाणे सुनिता देखील सोशल मिडियावर खूपच अॅलक्टिव राहते. नुकतेच सोशल मिडियावर अनिलचे काही फोटो व्हायरल झाले होते, ज्यामध्ये तो आपले बाइसेप्स फ्लॉन्ट करताना दिसला होता.वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अनिल कपूर मलंग चित्रपटामध्ये पाहायला मिळाला होता. यामध्ये तो एक पोलीस ऑफिसर बनला होता. चित्रपटामध्ये लोकांना त्याचे काम खूपच पसंत आले होते. मोहित सुरीच्या डायरेक्शनमध्ये बनलेल्या या चित्रपटामध्ये आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेमध्ये होत्या.