बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने भलेही या जगाचा ३४ व्या वर्षी कमी वयामध्ये जगाचा निरोप घेतला पण त्याचे चाहते अजून त्याला विसरायला तयार नाहीत. मृत्युनंतर सुशांत सिंह राजपूतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. चाहते या फोटो आणि व्हिडिओज द्वारे सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली देत आहेत. तर सुशांत सिंह राजपूतच्या पर्सनल आयुष्यासंबंधित अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.सध्या सोशल मिडियावर सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती या गोष्टीचा खुलासा करताना पाहायला मिळत आहे कि ती आता सुशांत सिंह राजपूतसोबत बोलत नव्हती. एका एंटरटेनमेंट वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अंकिता लोखंडेने सांगितले होते कि, तिच्या आणि सुशांत सिंह राजपूत दरम्यान बातचीत बंद झाली होती.
अंकिता लोखंडेने म्हंटले होते कि ती ब्रेकअपच्या नैराश्यामधून आता बाहेर आली आहे. पहिला तिला या वेदनेमधून बाहेर पडण्यासाठी खूपच त्रास झाला होता पण नंतर या गोष्टीची जाणीव देखील झाली कि हे काम इतके कठीण देखील नव्हते. इथे अंकिताने हे देखील सांगितले होते कि जर संधी मिळाली तरी देखील ती सुशांतसोबत पुन्हा बोलू शकणार नव्हती. काही लोक ब्रेकअप नंतर देखील मित्र बनून राहतात पण प्रत्येकाला ते जमत नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.