टीव्ही जगतामधील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमी चर्चेमध्ये असते. पवित्र रिश्तामधून आपल्या करियरची सुरुवात करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडेने इंडस्ट्रीमध्ये खूप नाव कमवले आहे. ती बॉलीवूड चित्रपटांचा देखील भाग बनली आहे. विक्की जैन आणि अंकिता लोखंडेचा लाँगटाईम बॉयफ्रेंड होता आणि आता तो तिचा पती बनला आहे.

दोघांच्या लग्नाला आता सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. अंकिता नेहमी विक्की सोबत आपले काही रोमँटिक फोटो शेअर करत असते. आता नुकतेच तिने काही फोटो शेयर केले आहेत जे खूपच चर्चेमध्ये आहेत. अंकिताचे हे फोटो पाहून असा कयास लावला जात आहे कि ती आता आई होणार आहे. अंकिता सोशल मिडियावर खूपच सक्रीय असते.

ती नेहमी आपले स्टनिंग फोटो सोशल मिडियावर शेयर करत राहते. नुकतेच तिने पती विक्की जैनसोबत काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये अंकिता ब्लू कलरच्या कंटिंग ड्रेसमध्ये दिसली. फोटोमध्ये दिसत आहे कि अंकिता आणि विक्की कॅमेऱ्यासमोर रोमँटिक पोज देत आहेत. हे फोटो शेयर करताना अंकिताने लिहिले आहे कि, तुम्ही जसे आहात तसेच राहा जसे राहाल मी त्याच रुपामध्ये प्रेम करत राहीन.

अंकिता आणि विक्कीच्या फोटोंना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. एकीकडे जिथे काही लोक त्यांच्या या केमेस्ट्रीचे कौतुक करत आहेत तर काही लोक असा अंदाज लावत आहेत कि अंकिता प्रेग्नंट आहे. अंकिताने जे फोटो शेयर केले आहेत अशामध्ये लोक कयास लावत आहेत कि ती आता आई होणार आहे.

एका इवेंटमध्ये अंकिता आणि विक्कीने स्वतः या मुद्यावर बातचीत केली होती. वास्तविक अंकिताला आलिया भट्टच्या प्रेग्नंसीवर प्रतिक्रिया मागितली गेली होती. अंकिता म्हणाली होईत कि ती खूप खुश आहे आणि आलिया आणि रणबीर कपूरला शुभेच्छा देते. तेव्हा तिला विचारण्यात आले कि तू अशी गुड न्यूज केव्हा देणार आहेस ? यावर तिचा पती विक्की जैन म्हणाला होता कि आम्ही देखील लाईनमध्ये आहोत. इतके ऐकताच अंकिता हैराण झाली होती आणि विक्कीला गप्प करू लागली होती.

तथापि युजर्सच्या कमेंटवर विक्की आणि अंकिता लोखंडेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अंकिता या फोटोंमध्ये पतीसोबत खूपच सिरीयस पोज देताना दिसत आहे. बॉलीवूडमध्ये सध्या प्रेग्नंसीच्या बातम्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. एक महिन्याआधी आलिया भट्टने गुड न्यूज दिली होती तर आता नुकतेच बिपाशा बसूने देखील गुड न्यूज दिली आहे.

तर सोनम कपूर बेबी बंप सोबत करण जौहरच्या शोमध्ये आली होती. अशामध्ये जर अंकिता लोखंडेने आपल्या प्रेग्नंसीची अनाउंसमेंट केली तर काहीच आश्चर्य वाटणार नाही. तथापि आतापर्यंत युजर्सच्या कमेंट्सवर अंकिताने कोणतेही वक्तव्य केलेले नाही.